घरताज्या घडामोडीआता शिवसेनेचं नाव शिल्लक सेना करून घ्यावं, निलेश राणेंचा टोला

आता शिवसेनेचं नाव शिल्लक सेना करून घ्यावं, निलेश राणेंचा टोला

Subscribe

अनेक विरोधक शिंदे गटाच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, तर ठाकरे गटावर निशाणा  साधत आहेत. त्यातच, आता माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेतील ठाकरे गटावर टीका केली.

सेनेतील बंडखोर नेत्यांमुळे राज्यभर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षाने शिवसेनेतील ठाकरे गटाला लक्ष्य केलं आहे तर शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. अनेक विरोधक शिंदे गटाच्या समर्थनार्थ वक्तव्य करत आहेत, तर ठाकरे गटावर निशाणा साधत आहेत. त्यातच, आता माजी खासदार निलेश राणे यांनीही शिवसेनेतील ठाकरे गटावर टीका केली. (Nilesh Rane’s mischievous advice to name Shiv Sena as Shillak Sena)

हेही वाचा ज्यांचा आत्मा मेलाय त्यांच्याकडून निष्ठेची काय अपेक्षा ठेवणार? संजय राऊतांचा बंडखोरांवर पुन्हा हल्ला

- Advertisement -

“एकनाथजी शिंदें सोबत इतके आमदार निघून गेले आहेत की उद्धव ठाकरेंनी आता स्वतःच्या गटाचं नाव “शिवसेना” ऐवजी “शिल्लक सेना” करून घ्यावं”, असा खोचक टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० पेक्षा जास्त आमदार आहेत. तर, यामध्ये कॅबिनेटमधील अनेक मंत्रीही आहेत. त्यामुळे शिवसेनेतील अनेक मंत्री शिंदेंसोबत गेल्याने  शिवसेनेतील ही बंडखोरी ठाकरे गटाला त्रासदायक ठरणार आहे. दरम्यान, अनेकजण या प्रकरणावर उद्धव ठाकरेंवर टीका करताना दिसत आहेत.

- Advertisement -

… आदित्यलाही सांगा

बंडखोर आमदारांवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या बापाच्या नावाने मतं मागा असं ठणकावून सांगितलं होतं. शिवसेनेच्या बापाच्या जीवावर निवडून येता असं त्यांचं म्हणणं होतं. यावरून निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना निशाण्यावर घेतलं होतं. बापाच्या नावाने मते मागण्याचा सल्ला आदित्य ठाकरे यांनाही द्यावा, असं निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले आहेत.


लवकरच बाजार उठणार

तीस-तीस वर्षे ज्यांनी पक्षात काम केलं, त्यांना घाण म्हणण्याचा नीचपणा पेग्विंग सेनेने केला आहे. तुमचा बाजार लवकरच उठणार, असा इशाराही निलेश राणे यांनी केला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -