घरट्रेंडिंगराज्यात 3957 नवे कोरोना रुग्ण, मुंबईत 11844 सक्रिय रुग्ण

राज्यात 3957 नवे कोरोना रुग्ण, मुंबईत 11844 सक्रिय रुग्ण

Subscribe

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) दिवसेंदिवस वाढ आहेत. या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि सरकार सतर्क झाले असून, काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. अशातच आज राज्यात 3 हजार 957 कोरोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. (3957 new corona cases in maharashtra)

राज्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आज मुंबईत (Mumbai) झाली आहे. मुंबईत सध्या 11 हजार 844 सक्रिय रुग्ण आहेत. तसेच मागील दोन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. आज मात्र या संख्येत काहीशी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार, दिवसभरात एकूण 3 हजार 696 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ; आरोग्य यंत्रणा सतर्क

कोरोनाची लागण झाल्याने आज राज्यात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील (Maharashtra) मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तसेच, आतापर्यंत राज्यामध्ये 77 लाख 98 हजार 817 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्के इतके झाले आहे.

- Advertisement -

राज्यात आज एकूण 25 हजार 735 सक्रिय रुग्ण संख्या आहे. मुंबईत 11 हजार 844 रुग्ण असून ठाण्यामध्ये 5 हजार 655 सक्रिय रुग्ण आहेत. शिवाय, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं नागरिकांच्या चिंतेत वाढ होत आहे.

देशात 14 हजार 506 नवीन कोरोनाबाधित

गेल्या 24 तासात देशात 14 हजार 506 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात कोरोनामुळं देशात 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. दरम्यान, कालच्यापेक्षा आज कोरोना रुग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे.


हेही वाचा – माझ्याच लोकांनी मला फसवलं, सहकार्याबद्दल धन्यवाद, मुख्यमंत्री भावूक

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -