घरदेश-विदेशमंकीपॉक्स विषाणूपासून भारताला वाचविण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून लस संशोधन सुरू; पुनावाला यांची माहिती

मंकीपॉक्स विषाणूपासून भारताला वाचविण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटकडून लस संशोधन सुरू; पुनावाला यांची माहिती

Subscribe

भारतातील मंकीपॉक्सचा (monkeypox) वाढता संसर्ग पाहता सिरम इन्स्टिट्यूट कडून या विषयानुसार लस संशोधन सुरू आहे. या बाबत पुनावाला यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली.

मंकीपॉक्स(monkeypox) विषाणूचा धोका जगभर वाढताना आहे. मंकीपॉक्स विषाणूवरून लस शोधण्यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे(serum institute) अदर पुनावाला(adar poonawalla) आणि केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्यात बैठक पार पडली. याच संदर्भातील माहिती पुनावाला यांनी मंगळवारी दिली. त्यावेळी ते म्हणाले. भारतातील मंकीपॉक्सचा (monkeypox) वाढता संसर्ग पाहता सिरम इन्स्टिट्यूट कडून या विषयानुसार लस संशोधन सुरू आहे. या बाबत पुनावाला यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती दिली.

हे ही वाचा – Monkeypox : भारतातही मंकीपॉक्सचा धोका वाढला; अशाप्रकारे पसरतोय संसर्ग; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

- Advertisement -

देशात मंकीपॉक्सच्या(monkeypox) रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. भारतात आत्तापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळले आहेत. मंडलवारी दिल्लीमध्ये ३५ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आयसीएमआर पुणे येथील राष्ट्रीय विषाणूतज्ज्ञ संस्थेने एक रुग्णाच्या नमुन्यांमधुन मंकीपॉक्स विषाणूला वेगळे केले आहे. त्याची मदत मंकीपॉक्स विषाणूच्या विरोधी लस बनविण्यासाठी होणार आहे. याच संदर्भांत आयसीएमआरने इच्छुक भारतीय लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मंकीपॉक्स विरुद्ध लस निर्मिती करण्याचे आवाहनही केले आहे.

हे ही वाचा – MonkeyPox alert : कोरोनानंतर देशात मंकीपॉक्सचा धोका; ‘या’ राज्याकडून अलर्ट जारी

- Advertisement -

मंकीपॉक्सवर लावकरच लस येणार

सिरम इन्स्टिट्यूटचे(serum institute) सीइओ अदर पुनावाला(adar poonawalla) यांनी सांगितले, की ‘मंकीपॉक्स विरोधी लस लवकरच उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुद्धा आहे. गेल्या काही दिवसांपासून मंकीपॉक्सच्या(monkeypox) विषाणूने अनेक देशांमध्ये वेगाने हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याच प्रमाणे भारतात सुद्धा या विषाणूचा धोका वाढतो आहे. आता भारतातही मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकाराने समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे.त्याचबरोबर सिरम कडूनसुद्धा लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंकीपॉक्स विषाणूच्या विरोधातील लस काहीच महिन्यात उपलब्ध होईल’.

हे ही वाचा – Monkeypox Virus ने वाढवली जगाची चिंता; केंद्रानंतर महाराष्ट्र सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -