घरअर्थजगत...तरच भारताचा विकास होईल; अदानी, अंबानी यांचा उल्लेख करत अमिताभ कांत यांचं...

…तरच भारताचा विकास होईल; अदानी, अंबानी यांचा उल्लेख करत अमिताभ कांत यांचं विधान

Subscribe

नवी दिल्ली- भारताचा विकास व्हायचा असेल तर आपल्याला १० हजार अंबानी आणि २० हजार अदानी हवे आहेत, असं जी २० चे (Sherpa Of India) अधिकारी अमिताभ कांत म्हणाले. १ डिसेंबरपासून भारत जी २० चं (G20) अध्यक्षपद भूषवणार आहे. यासाठी बैठकीचा लोगो, थीम आणि वेबसाईटचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. या कार्यक्रमात अमिताभ कांत बोलत होते.

हेही वाचा – भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा; फोर्ब्सच्या यादीत 3 भारतीय महिलांचा समावेश

- Advertisement -

आम्हाला एक अंबानी आणि एक अदानी नाही तर दहा हजार अंबानी आणि २० हजार अदानी हवे आहेत. तरच भारताचा विकास होईल. यासाठी आपल्याला जी २० च्या संधींचा उपयोग आपआपल्या क्षेत्रात आणखी मोठे होण्यासाठी केला पाहिजे. अशी संधी आपल्याला परत मिळणार नाही, असंही अमिताभ कांत म्हणाले.

हेही वाचा – Forbesच्या उत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचा समावेश

- Advertisement -

५ ते ७ डिसेंबरमध्ये उदयपूर येथे जी२० शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं अध्यक्षपद भारताने स्वीकारलं असल्याने परिषद भारतात होत आहे. उदयपूर येथील सिटी पॅलेस येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे. जिल्हा प्रशासन आणि पर्यटन विभाग या परिषदेच्या तयारीसाठी कामाला लागलं आहे. या परिषदेत २० देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. १९९९ सालानंतर पहिल्यांदा या परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आहे.

हेही वाचा – ऑक्टोबरमध्ये जीएसटीपोटी जमा झाले 1.52 लाख कोटी, एप्रिलनंतरचे दुसरे सर्वोच्च संकलन

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -