घरताज्या घडामोडीकानपूरमध्ये भीषण आग : 800हून अधिक कापड दुकानं जळून खाक, 20 अब्ज...

कानपूरमध्ये भीषण आग : 800हून अधिक कापड दुकानं जळून खाक, 20 अब्ज रुपयांचे नुकसान

Subscribe

कानपूरमधील बांसमंडीतील हमराज कॉम्प्लेक्स क्लॉथ मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. या मार्केटमधील एआर टॉवरमध्ये शॉर्टसर्किटमुळे दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या मालाला आग लागल्याचे समजते. गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीत 800हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत.

कानपूरमधील बांसमंडीतील हमराज कॉम्प्लेक्स क्लॉथ मार्केटमध्ये आग लागल्याची घटना घडली. या मार्केटमधील एआर टॉवरमध्ये शॉर्टसर्किटमुळे दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या मालाला आग लागल्याचे समजते. गुरूवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून, या आगीत 800हून अधिक दुकानं जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे मध्यरात्री लागलेली ही आग 8 तास उलटून गेले तरी धुमसत आहे. (kanpur textile shops fire wholesale market burning up)

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजण्याच्या सुमारास बांसमंडीतील हमराज कॉम्प्लेक्स क्लॉथ मार्केटमध्ये असलेल्या एआर टॉवरमध्ये शॉर्टसर्किटमुळे दुकानांच्या बाहेर ठेवलेल्या मालाला आग लागली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आगीने अनेक दुकानांना काही क्षणातच आपल्या कवेत घेतले. यानंतर संपूर्ण 3 मजली टॉवर पेटले. त्यानंतर आग लगतच्या मसूद टॉवर आणि नंतर मसूद कॉम्प्लेक्स-2 आणि नंतर हमराज कॉम्प्लेक्समध्ये पसरली.

- Advertisement -

या आगीची माहिती मिळताच लष्कर, हवाई दल, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कानपूर, उन्नाव, लखनऊसह जवळपासच्या अनेक जिल्ह्यांतील अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

या आगीत 800हून अधिक दुकानं जळून खाक झाली असून जवळपास 2 हजार कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच, ही भीषण आग पाहता बासमंडीकडे जाणारी सर्व वाहने बंद करण्यात आली आहेत. एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथकही जवळपासच्या दुकानदारांना दुकाने खाली करण्याचे आवाहन करत आहेत.

- Advertisement -

या 5 कॉम्प्लेक्सला आग

एआर टॉवरपासून सुरू झालेली आग नफीस टॉवर, अर्जुन कॉम्प्लेक्स, मसूद कॉम्प्लेक्स-1 आणि मसूद कॉम्प्लेक्स-2 मध्ये पसरली आहे. या पाच संकुलात ज्वाळा आणि धुराचे लोटही वाढत आहेत. नफीस टॉवरमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आहे. या टॉवरलाही आग लागली आहे. या आगीने बँकेलाही वेढले आहे.


हेही वाचा – मालाड मालवणीतील दगडफेकप्रकरणी 25 जण पोलिसांच्या ताब्यात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -