घरदेश-विदेश'नरेंद्र मोदी २१व्या शतकातील आंबेडकर'

‘नरेंद्र मोदी २१व्या शतकातील आंबेडकर’

Subscribe

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २१व्या शतकाली बाबासाहेब आंबेडकर असल्याचं उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. १० टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावरील केंद्राच्या निर्णयानंतर आर्थिकरित्या मागास वर्गाला फायदा होणार आहे. असे ऐतिहासिक पाऊल उचलल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. यावेळी स्तुती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचा फायदा अनेकांना होणार असल्याचं त्रिवेंद्र सिंह रावत यांनी म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना बाबासाहेब आंबेडकरांशी केली.

आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण

सरकारनं सर्व जातींमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांना शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. लोकसभेत बिल संमत देखील झालं असून आता राज्यसभेची मंजुरी मिळणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्थिक मागास सवर्णांना देखील शिक्षण आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. आर्थिक मागास सवर्णांना आरक्षण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी खबरदारी घेतल्याचं बोललं जात आहे. खुद्द मंत्र्यांना देखील याबाबत कोणतीही माहिती नव्हती. १० टक्के आर्थिक आरक्षणामुळे सरकारवर सध्या तरी टीका होतेय.

वाचा – भर सभेत महिलेने मुख्यमंत्र्यांना दिल्या शिव्या

वाचा – आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना मिळणार १० टक्के आरक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -