‘काय झाडी, काय डोंगूर’, ‘सई’ एकदम ओकेमध्ये, सोशल मीडियावर सई ताम्हणकरच्या फोटोवर भन्नाट कमेंट्स

नुकताच सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे त्या फोटोवर सईच्या चाहत्यांच्या आणि सिने विश्वातील अनेक सेलिब्रिटींकडून कमेंट्स येत आहेत.

बोल्ड अँड ब्युटीफुल अशी ओळख असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर(sai tamhankar) तिच्या प्रियकर अनिशच्या(anish jog) वाढदिवसानिमित्त एका निसर्गरम्य ठिकाणी फिरायला गेली तेव्हाचा रोमँटिक फोटो पोस्ट केला होता. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांच्या लग्नालाही सई आणि अनिश यांनी एकत्र हजेरी लावली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची चर्चा सुरु आहे.

आणखी वाचा –  सई ताम्हणकरने केला तिच्या अंर्तवस्त्रांबाबत धक्कादायक खुलासा…! शेअर व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

आणखी वाचा –  मराठमोळ्या सई ताम्हणकरने पटकावला IIFA 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

मराठीमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये जिचं नाव आवर्जून घेतलं जातं अशी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकताच सईने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो पोस्ट केला आहे त्या फोटोवर सईच्या चाहत्यांच्या आणि सिने विश्वातील अनेक सेलिब्रिटींकडून कमेंट्स येत आहेत. सईने तिचा प्रियकर अनिश सोबतचा हा फोटो पोस्ट केला आहे. या दोघांच्याही अफेअरची चर्चा सुद्धा गेल्या काही दिवसांपासून रंगत होती. या आधी सुद्धा सईने अनिश सोबतचा एक फोटो पोस्ट करत तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

आणखी वाचा –  प्राजक्ता माळीच्या पावसाळी ट्रिपची सोशल मीडियावर चर्चा, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

दरम्यान सई ताम्हणकरने पोस्ट केलेल्या फोटोवर अमृता खानविलकर(amruta khanwilkar), मुक्ता बर्वे(mukta barve), रसिका सुनिल, स्वप्नील जोशी9swapnil joshi), क्षितिज पटवर्धन या कलाकारांनी सुद्धा कमेंट्स केल्या आहेत आणि हार्टचे इमोजी सुद्धा पोस्ट केले आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी सुद्धा कमेंट्स दिल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गाजत असलेला एक डायलॉग एकाने कमेंट बॉक्स मध्ये पोस्ट केला आहे. ‘काय झाडी… काय डोंगूर… काय हाटील…एकदम ओके मध्ये’ असं एकाने लिहिलंय. ‘साहेब दौलतराव, सापडला’ असं हॅशटॅग वापरत सईने अनिश सोबतच एक फोटो पोस्ट केला होता. पण त्यांच्या अफेअर संदर्भात अनिश किंवा सईने माध्यमांसमोर कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

आणखी वाचा – लोणावळ्यात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम; पिकनिक दरम्यानचे फोटो व्हायरल

 

आणखी वाचा – सई ताम्हणकर ‘या’ व्यक्तीसोबत आहे रिलेशनशीपमध्ये? ‘दौलतराव’ टॅग देत फोटो केला पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Anish Joag (@anishjoag)

कोण आहे अनिश ?

सई ताम्हाणकरचा प्रियकर अनिश जोग हा एक चित्रपट निर्माता आहे. अनिशने आत्तापर्यंत अनेक नावाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. व्हायझेड, धुरळा(dhurala), मुरांबा, टाईमप्लीज, गर्लफ्रेंड या चित्रपटांची निर्मिती अनिश जोग याने केली आहे. तर अभिनेत्री सई ताम्हाणकरने सुद्धा मराठी मालिकांमध्ये काम करत आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत स्वतःची एक वेगळी ओळख सिने सृष्टीमध्ये निर्माण केली आहे. सई ताम्हणकर मराठी चित्रपट सृष्टीमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. सध्या ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा'(maharashtrachi hasyjatra) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.