घरमहाराष्ट्रपक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे - उदय...

पक्ष पुन्हा उभा करायचा असेल तर सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे – उदय सामंत

Subscribe

राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस उलथापालथ होत असताना कोकणातील आमदार (MLA from Kokan) मात्र त्यांच्या निवासस्थानी असल्याचं समोर आलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) हे उद्धव ठाकरे यांच्या बाजुने असून मी तोडणारा नाही जोडणारा आहे, असं ते म्हणालेत. (If the party wants to re-emerge, everyone must be convinced – Uday Samant)

हेही वाचा -एकनाथ शिंदे गुवाहाटीमधून मुंबईच्या दिशेने?

- Advertisement -

उदय सामंत पुढे म्हणाले की, मी शिंदेंसोबत गेलो असतो तर गुवाहाटीला गेलो असतो. तिथून बोललो असतो. सध्या एकसंघ राहणं गरजेचं आहे. ज्या नेतृत्त्वाने संधी दिली, ज्यामुळे आपण आमदार झालो, त्या आमदारकीचं सोनं करणारे कोकणातील आमदार आहेत.

आणखी वाचा 

- Advertisement -

ते पुढे म्हणाले की, विकासाला ताकद देणं, निधी घेऊन येणं, लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणं ही आमची जबाबदारी आहे. शिरसाट काही बोलले म्हणून मी बोलणं योग्य नाही. मी जोडणारा आहे, तोडणारा नाही. पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटतं की कुठंतरी सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे, असं मला वैयक्तिक वाटतं.

आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणं गरजेचं आहे. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा 

आमच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदांनी काढलेली नोटीस त्यामध्ये टेक्निकली बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल, पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे आणि कायदेशीर लढाईला आम्हाला सामोरं गेलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी गट निर्माण केला आहे म्हणजे त्यांचे मत बदलले असं नाही.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -