घरदेश-विदेशLive Update : कळवा रेल्वे स्थानक परिसरात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची...

Live Update : कळवा रेल्वे स्थानक परिसरात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Subscribe

कळवा रेल्वे स्थानक परिसरात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेवर वाहतूक विस्कळीत

- Advertisement -

राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी 7 डिसेंबरपर्यंत सुनावणी तहकूब

मविआ सरकारनं दिलेली आमदारांच्या नावाची यादी शिंदे सरकारकडून मागे

- Advertisement -

धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार, राज्य मंत्रिमंडळात निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता बैठक पार पडली, यातील मुद्दे आता समोर आले आहेत.

धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. (इतर मागास बहुजन कल्याण)

राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. 4250 कोटी तरतुदीस मान्यता (उद्योग विभाग)

मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. (जलसंपदा विभाग)

अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार (वैद्यकीय शिक्षण)

मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.
(वस्त्रोद्योग विभाग)

गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार
(इतर मागास बहुजन कल्याण)

विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा (सहकार विभाग)

मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार (पर्यटन विभाग)

बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार (गृह विभाग)

महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार (पशुसंवर्धन)

नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ


पंकजा मुंडेकडून बीडमध्ये जाळपोळ केलेल्या जागांची पाहणी

पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे आज बीड दौऱ्यावर आहेत. त्या बीडमध्ये जाळपोळ केलेल्या सर्व जागांची पाहणी करत आहेत.


बाळासाहेब सराटेंच्या याचिकेवर 3 जानेवारीला पुढील सुनावणी


सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगेंची भेट घेणार

सरकारचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी 5 वाजता मनोज जरांगेंची भेट घेणार आहे. उदय सामंत, संदीपान भुमरे आणि अतुल सावे मनोज जरांगेंना आज भेटणार आहेत.


मराठा समाजानंतर आता वंजारी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक

वंजारी समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याची मागणी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासहेब सानप यांनी केली आहे.


England vs Netherlands : इंग्लंड संघाचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय


महादेव App प्रकरणी सौरभ चंद्राकरविरोधात गुन्हा दाखल

महादेव Appद्वारे 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांकडून माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


मंत्रिमंडळ बैठकीआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर दाखल


छगन भुजबळ मुंबई उच्च न्यायालयात दाखल

ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली आहे. सुनावणीसाठी छगन भुजबळ उच्च न्यायालयात दाखल झाले आहेत.


बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धनगर समाजाचा मोर्चा

पारंपारिक वाद्य वाजवत धनगर समाज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहे.


मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 2 कायमचं बंद

सायंकाळी होणाऱ्या गर्दीमुळे रेल्वे प्रशासनाचा निर्णय

दादर लोकल आता परेल स्टेशनवरून सुटणार


पंढरपूर मंदिर समितीच आज दुपारी बैठक

महापूजा कोण करणार याबाबत पेच कायम असल्यामुळे आज दुपारी बैठक होत आहे.


24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळालं तर आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार – मनोज जरांगे

मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे मागील 30-40 वर्षांपासून ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव होता आणि म्हणून पुरावे असूनही आरक्षण मिळत नव्हतं, असा आरोप त्यांनी केला आहे.


मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर आज ब्लॉक

गँट्री उभारण्याच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असून दुपारी दोन ते अडीच या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद


England vs Netherlands : आज पुण्यात इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएश स्टेडियमवर आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 40 वा सामना पार पडणार आहे.


पुणे जिल्हा सहकारी बँकेची आज निवडणूक

पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे त्याठिकाणी जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेवर आज निवडणूक होत आहे. नव्या संचालक निवडीचे सर्व अधिकार अजित पवार यांच्याकडे दिले आहे.


राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 1 वाजता बैठक

राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक होणार असून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर याचे पडसाद या बैठकीत पडण्याची चिन्ह आहे. याशिवाय शिंदे सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा विचारात आहे.


पंजाबच्या रुपनगरमध्ये भूकंपाचे धक्के, भूकंपाची तीव्रता 3.2 रिश्टर स्केल इतकी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -