घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन;...

Lok Sabha 2024 : मोदींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर घणाघात

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकडे ना बॉलर आहेत, ना बॅट्समन, जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली.

सावनेर : विरोधी पक्षांची आघाडी मोदी द्वेषाने पिडीत आहे. मोदींना हरवायचे असा त्यांनी पण केलाय. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकडे ना बॉलर आहेत, ना बॅट्समन, जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू आहेत, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली. सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते. (Lok Sabha Election 2024 Opposition has neither bowler nor batsman to take Narendra Modis wicket Eknath Shinde)

मागील 10 वर्ष आपण मोदींची बॅटींग पाहिली. त्यांनी देशाचा विकास केला आहे. आता पुढची पाच वर्ष पंतप्रधान मोदी चौकार आणि षटकार मारून विरोधकांना झोडपल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. मोदींसाठी नेशन फर्स्ट हा अजेंडा आहे. विरोधकांकडे झेंडा नाही, अजेंडा नाही. विरोधक कमिशन आणि करप्शन फर्स्टसाठी काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 वर्षात केलेले काम आणि काँग्रेसने 50 ते 60 वर्षांत केलेले काम जनतेसमोर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म राजनितीसाठी नाही तर राष्ट्रनितीसाठी झाला आहे. त्यांनी संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केल आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उदयनराजेंना उमेदवारी देण्यात वेळ का लागला त्याचे आत्मपरिक्षण करा; भाजपला सवाल कोणाचा?

परदेशात जाऊन देशाची बदनामी करणाऱ्यांना मतदान करणार की, अविरत देशसेवा करणाऱ्या नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणार, हा विचार मतदारांनी करायचा आहे. विरोधकांकडे अहंकार आहे, तर मोदींकडे आत्मविश्वास आहे. अहकांर विनाशाकडे नेतो तर आत्मविश्वास विजयाकडे नेतो. मोदींमुळे देशात राममंदीर उभे राहिले. सरकारने हिंमत दाखवून 370 कलम हटवले. देशातील प्रत्येक नागरिकाला प्रगतीकडे नेण्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला आहे. महायुतीला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत असे त्यांनी सांगितले. रामटेक पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र 1996 साली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली आणि तेव्हापासून रामटेकवर भगवा फडकत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रभू रामाची निशाणी धनुष्यबाण आणि महायुतीची निशाणी धनुष्यबाण आहे. काहीजण राम राम करतात मात्र त्यांची अवस्था म्हणजे मुहं मे राम बगल में छुरी अशी झाली असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : वर्षावर राजकीय बैठक नाहीत, मुख्यमंत्री कार्यालयाचा आयोगाकडे खुलासा

निवडणुकीत इंडीया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा (Destroy the monster called India Aghadi in elections)

रामटेकमध्ये प्रभू रामचंद्रांनी चार महिने वास्तव्य केले होते. या काळात ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा प्रभूंनी नाश केला होता. आताही तशीच वेळ आली आहे. येत्या निवडणुकीत इंडिया आघाडी नावाच्या राक्षसाचा नाश करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केले आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -