घरमहाराष्ट्रMaharashtra Budget Session : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी काय ?

Maharashtra Budget Session : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी काय ?

Subscribe

या अर्थसंकल्पात मुलीच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प मांडला. महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे. तसेच या अर्थसंकल्पात मुलीच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

अजित पवार म्हणाले की, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेंतर्गत 300 युनिटपर्यंत मोपत वीज देणार, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना सुरू करणार, ऊर्जा विभागासाठी 11 हजार 934 कोटींच्या निधीती तरतूद करणार असल्याची घोषणा करतानाच राज्य सरकारचे 7 हजार मेगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. याशिवाय औंधमध्ये एम्स रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. निराधार अनुदान आणि श्रावणबाळ योजनेच्या अर्थसहाय्यात वाढ करणार, बार्टीच्या धरतीवर आर्टी संस्था सुरू करण्यात येणार, ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना लागू करणार आणि आदिवासी विकास विभागासाठी 15 हजार कोटींचा निधी प्रस्तावित असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन उभारणार

शिवरायांच्या जयंतीनिमित्त आनंदाच्या शिध्याचं वाटप करणार असल्याचे सांगताना अजित पवार म्हणाले की, राज्यात 2 हजार नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करणार, अयोध्या आणि श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात 32 किल्ल्यांचं सुशोभीकरण करण्यात येईल, पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखणार आहे. राज्यातील 50 पर्यटन स्थळांची निवड केली जाणार आहे. याशिवाय सांस्कृतिक कार्य विभागाला 1 हजार 186 कोटी निधी प्रस्तावित आहे. तसेच राज्यात पोलीस शिपायांची 17 हजार 471 रिक्त पदे भरणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

हेही वाचा – Manoj Jarange : मी दिलगिरी व्यक्त करतो; एसआयटी चौकशी लागू होताच जरांगेंना उपरती!

- Advertisement -

‘या’ आहेत महिलांसाठीच्या योजना

  • महिला आणि बालकल्याण विभागाला 3107 कोटी रुपयांची तरतूद देण्यात आली आहे.
  • मुलींना 18 वर्षांपर्यंत विविध टप्प्यांमध्ये एक लाख एक हजार रुपये निधी देण्यात येईल आहे.
  • एक लाख महिलांना रोजगार देण्यात येणार आहे.
  • आंगणवाडी सेविकांची 14 लाख पदे भरण्यात आली आहेत.
  • पाच हजार पिंक रिक्षा महिलांना देण्यात येणार आहे.
  • वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत शिधा वाटप करताना एका महिलेस 1 साडी देण्याचे काम सुरू

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -