घरमहाराष्ट्रसरकारकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार, काँग्रेस-राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी- अजित पवार

सरकारकडे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार, काँग्रेस-राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी- अजित पवार

Subscribe

काही मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी सध्याच्या घडीला अनेक मंत्री उपस्थित आहेत. त्यांच्या विभागातील योजनांना परवानगी देण्यात येत आहे, असही अजित पवार म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आजही तीच आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीतील पेचप्रसंगावर रणनिती ठरवण्यासाठी शिष्टमंडळासह आज सायंकाळी मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेणार आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे.

कालच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांची खासदारांची बैठक झाली या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भूमिकेबद्दल सांगितलं होतं आज सकाळी मंत्रालयात गेल्यानंतर तिकडची कामं उरकून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी आलो या भेटीमध्ये त्यांच्याशी चर्चा केली. आज संध्याकाळी साडेसहा वाजता सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्री येथे जाणार आहोत. साधारण सुरू असलेल्या घडामोडीवर चर्चा होणार आहे. आताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तीच भूमिका आहे, जी काल सांगितली होती महाविकास आघाडी सरकार टिकवण्याचा प्रयत्न करायचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहायचं, असा विश्वास अजित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

… म्हणून महाविकास आघाडीला काही धोका नाही

जे काही विधिमंडळाच्या बाबत असेल ते विधिमंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्याबाबत निर्णय घेतील कारण सरकार म्हणून आम्हाला बोलण्याचा काहीही अधिकार नाही ते काम विधिमंडळाबाबत आहे त्यामुळे यावर्षी विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ बोलतील. परंतु एकनाथ शिंदे सोबत असलेले आमदार आपण शिवसेनेचे आमदार असल्याचे सांगत आहेत त्यामुळे जर ते शिवसेनेच्या असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे बहुमत आहे म्हणून महाविकास आघाडीला काही धोका नाही. असही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांसोबत रणनिती ठरवणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मध्यंतरी कोरोना संसर्ग झाला होता त्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही गेलो नव्हतो परंतु आज संध्याकाळी साडेसहा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार प्रफुल्ल पटेल आणि मी भेट देण्यासाठी जाणार आहे या वेळी जयंत पाटील सुद्धा उपस्थित असतील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काय मत आहे तसेच पुढील रणनीती काय असेल या वरती चर्चा होईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

देशाच्या पातळीवर वेगवेगळ्या मंत्र्यांची लिस्ट फायनल केली जायाची तेव्हा राज्यातील मुख्यंमंत्र्याचा पाचवा नंबर असयाचा याचा अंतर्गत काम चांगल चाललं होतं. कोरोनासारख्या संकटावर मात करत राज्यात कार्यक्रम राबले गेले ते सुद्धा योग्य पद्धतीने हाताळण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने त्यांना पुर्णपणे सहकार्य केल. हा विकास आघाडी सरकारमध्ये आहे त्यामुळे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार सरकारला आहे. काही मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी सध्याच्या घडीला अनेक मंत्री उपस्थित आहेत. त्यांच्या विभागातील योजनांना परवानगी देण्यात येत आहे, असही अजित पवार म्हणाले.


हे हि वाचा – कोट्यवधींचा बंगला, लाखो रुपयांच्या गाड्या; तरी एकनाथ शिंदेंवर आहे कर्जाचा डोंगर

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -