घरदेश-विदेशSanjay Raut : निवडणूक रोख्यांवरून राऊतांचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Sanjay Raut : निवडणूक रोख्यांवरून राऊतांचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Subscribe

निवडणूक रोखे अर्थातच इलेक्टोरल बॉण्ड, पीएम केअर फंड आणि इतर पक्षातील भ्रष्टाचाऱ्यांना भाजपाने स्वतःच पक्षात सहभागी करून घेतल्याने खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचा आजही विश्वास आहे. 2014, 2019 या दोन्ही वर्षांच्या भाजपाच्या जाहीरनाम्यात भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटण करण्याची गॅरंटी त्यांनी घेतली, पण आता तेच भ्रष्टाचारी त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहेत, असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घोटाळा केल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. याचवेळी त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. (Sanjay Raut criticize Modi government over issue of Electoral Bonds)

आज सोमवारी (ता. 15 एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेतून खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. यावेळी ते म्हणाले की, मोदींच्या प्रत्येक जाहीरनाम्यात ते भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारी व्यक्तींचे समूळ उच्चाटन करू असे गॅरंटी देत आहेत. ही गॅरंटी ते 2014 पासून देत आहेत. आता नव्याने त्यांनी हीच गॅरंटी दिली आहे. पण गेल्या दीड ते दोन वर्षांमध्ये देशातील सर्व भ्रष्टाचारी लोक त्यांनी आपल्या पक्षात घेतले आहेत. भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचाऱ्यांचा जनता पक्ष बनला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मोदींना गुळाची चव नाही, तशी…; ठाकरे गटाची बोचरी टीका

तर, भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात घेऊनही पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भ्रष्टाचाऱ्यांना नष्ट करण्याचे तुणतुणे सुरूच आहे. खरे तर हे ते करत असलेले ढोंग आहे, पण तरीही आम्ही पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेऊन आहोत, तो ठेवायलाही हवा, जरी ते कार्यवाहक मंत्री असले तरी, असा टोलाही राऊतांनी लगावला. निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा या विश्वातील सर्वात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे. हे जगाने देखील मान्य केले आहे. अनेक खासगी कंपन्या, ठेकेदार, दारुवाले व अन्य कंपन्या यांना हजारो कोटी रुपयांची कामे द्यायची आणि त्याच्या बदल्यात निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपाच्या निधीत हजारो कोटी रुपये गोळा करायचे, त्यामधून निवडणूक लढवायची, त्यामधून आमदार-खासदार खरेदी करायचे. हा भाजपाचा गोरख धंदा असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

- Advertisement -

मोदी सरकारच्या कोणत्याही व्यवहारात पारदर्शकता नाही. ऑडिट नाही. कोविड काळात सुरू करण्यात आलेल्या पीएम केअर फंडबाबत कोणतीही माहिती नाही. कोणी किती पैसे दिले, याचा काही हिशोब नाही, हे पैसे कशाच्या बदल्यात दिले?, त्यात परदेशी कंपन्या किती आहेत? त्याचा वापर कसा झाला, याबाबत मोदी काहीही बोलायला तयार नाही. पीएम केअर ही खासगी संस्था आहे. पण सरकारी असल्याचे दाखवून त्यात लाखो-कोटी रुपये गोळा करण्यात आले आहेत, असा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांच्याकडून यावेळी करण्यात आला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : भाजपा नेत्याची जीभ घसरली, काँग्रेसच्या महिला मंत्र्याला दिला अजब सल्ला


 Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -