घरताज्या घडामोडीशिंदे गटाला सत्ता परिवर्तन हवं, त्यामुळे हे प्रयत्न सुरू - शरद पवार

शिंदे गटाला सत्ता परिवर्तन हवं, त्यामुळे हे प्रयत्न सुरू – शरद पवार

Subscribe

राष्ट्रपतीची निवडणूक असल्यामुळे मी येथे आलो आहे. महाराष्ट्रात ज्यापद्धतीने परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थितीचा निकाल हा दिल्लीत नाही तर राज्यात घ्यायचा आहे. शिवसेनेचा एक गट हा आसाममध्ये गेला आहे. त्यांच्याकडून एक स्टेटमेंट समोर आली आहे. या स्टेटमेंटमधून समजतंय की, त्यांना सत्ता परिवर्तवन हवी आहे. सत्ता परिवर्तनासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. शिवसेनेची ही ख्याती आहे की, गेलेले बंडखोर परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होईल. ज्या सगळ्यांना मदत करणारे जे पक्ष आहेत. त्यांची भूमिका महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे पाठिंबा देण्याची आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

आमदार नक्कीच परत येतील… 

संजय राऊत यांनी ४० मृतदेह परत येतील हे विधान मी ऐकलं नाही पण गेलेले आमदार नक्कीच परत येतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आजही आमची आघाडी असून आघाडी टिकवण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा असेल, असं शरद पवार म्हणाले आहेत.

- Advertisement -

यशवंत सिन्हा उमेदवारी पदासाठी उद्या अर्ज दाखल करणार

राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रत्येक राज्यात राष्ट्रपदासाठी जे उमेदवार उभे राहणार आहेत. यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. परंतु या बैठकीचं शेड्यूल काय असेल आणि त्यांच्यासोबत कोण असणार?, याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत. यशवंत सिन्हा उमेदवारी पदासाठी उद्या अर्ज दाखल करणार असून आम्ही आज येथे उपस्थित राहिलो आहोत. यावेळी समाजवादी पार्टी आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पुढची रणनिती आखली जाणार आहे.

भाजपने एवढं केलं त्याचा फायदा काय?

जर राज्यात राष्ट्रपती राजवट आली तर भाजपने एवढं केलं त्याचा फायदा काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बंडखोरांनी गुजरात आणि आसाम हे दोन राज्य निवडले आहेत त्या राज्यात भाजपचे सरकार आहे. बंडखोरांकडे संख्याबळ असेल तर ते गुवाहटीत का थांबले आहेत?, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : विलीनीकरण केले नाही तर बहुमत असतानाही अपात्रतेची कारवाई; शिवसेनेच्या वकिलांनी सांगितला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -