1 एप्रिल 2021 पासूनच्या टेंडर न काढलेल्या कामांना शिंदे सरकारची स्थगिती

Education Minister praises staff for saving life of woman who suicide attempt in mantralaya
मंत्रालयातून उडी मारणाऱ्या महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शिक्षण मंत्र्यांकडून कौतुक

मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने पहिल्या दिवसापासून ठाकरे सरकारला एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आता शिंदे सरकारने मागील सरकारच्या काळातील मंजूर कामांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा या कामांना कधी मंजुरी मिळणार याची प्रतीक्षा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर आरे कारशेडचा निर्णय घेऊन आधीच्या महाविकास आघाडी सरकारला पहिला धक्का दिला. आर कारशेडचा वाद हा फडणवीस सरकार सत्तेवर असल्यापासूनचा आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतरही त्याला विरोध करण्यात येत आहे. ठाकरे सरकारने आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजुरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेतला. पण मुंबई उच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. आता शिंदे सरकारने हा प्रकल्प आरेतच होणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळातील बहुतांश निर्णयांना शिंदे सरकारने स्थगिती दिली. तर, अलीकडेच शिंदे – फडणवीस सरकारने नगरविकास खात्याने मंजूर केलेल्या 941 कोटी रुपयांच्या विकास कामांना स्थगिती दिली. यातील 245 कोटींची कामे ही बारामती नगर परिषदेची होती. विशेष म्हणजे, त्या सरकारमध्ये शिंदे हे स्वत: नगरविकासमंत्री होते. जलसंपदा विभागातील निधी वाटपासही स्थगिती देण्यात आली होती.

हेही वाचा – सर्वसामन्यांना मंत्रालयात पाण्याची बाटली नेण्यास बंदी; कारण वाचून व्हाल थक्क

जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उपयोजना, विशेष घटक योजनेतील १ एप्रिलपासून मंजूर झालेल्या पण निविदेच्या स्तरावर असलेल्या सर्व कामांना स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार या मंजूर कामांना स्थगिती देण्यात येत असून, तसे प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांकडे निर्णयार्थ सादर करण्याचा आदेश मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागांच्या सचिवांना सोमवारी दिला.

हेही वाचा – फुटिरांना कार्यकारिणी जाहीर करण्याचा अधिकार नाही, संजय राऊतांची टीका