घरताज्या घडामोडीशिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरील पुढील सुनावणी आता 20 जानेवारीला

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरील पुढील सुनावणी आता 20 जानेवारीला

Subscribe

शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा?, यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पक्षांतर्गत निवडणुका घेऊ द्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल देऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आयोगाला केली. आता या मुद्यावरील पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून यापूर्वी कागदपत्रं सादर करण्यात आली होती. निकाल आपल्या बाजूने लागावा, यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपत आहे. त्यामुळे ठाकरे गट दुहेरी संकटात सापडला आहे. ठाकरे गटाकडून 22 लाख 24 हजार 950 तर शिंदे गटाकडून 4 लाख 51 हजार 127 इतके प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटाकडून लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले.

- Advertisement -

ठाकरे गटाच्या वकीलांचा युक्तीवाद काय?

शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केला. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये असं सांगत ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केला.

- Advertisement -

शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये त्रूटी, कागदपत्रे तपासण्याची गरज आहे. धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आताच घेऊ नका. काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणे हे बेकायदेशीर असल्याचं म्हणत निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासाव्यात. सर्व कागदपत्रांची छाननी करावी, असा युक्तीवाद कपिल सिब्बल यांनी केला.

शिंदे गटाच्या वकीलांचा युक्तीवाद काय?

कागदपत्रामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांच्याकडून करण्यात आला. कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आहेत, असा दावा केला होता. तो खोडून काढताना जेठमलानी यांनी त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नसल्याचा दावा केला. तसेच या आधीच्या काही सुनावणींचा दाखला शिंदे गटाकडून देण्यात आला. आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे. आमदार, खासदारांचे बहुमत जास्त असल्याने पक्षचिन्हाचा निर्णय लवकर घ्या, असा युक्तीवाद जेठमलानी यांनी केला.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांनी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे. याबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. मात्र, आजही यावर निकाल लागला नसून पुढील सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच, ‘त्या’ फुटीला काहीच अर्थ नाही; कपिल सिब्बल यांचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -