बरं झालं गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

uddhav thackeray attack shinde group and bjp on advaya hire join shiv sena

भाजपचे मालेगाव तालुक्यातील नेते, आणि नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला रामराम करत शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. हिरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना भवनात जाऊन हातात शिवबंधन बांधल आहे. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरं झालं गद्दार केले त्यांच्यामुळे हिरे सापडले म्हणत शिंदे गटाला सणसणीत टोला लगावला आहे.

ते दगड गेले, बुडाले आणि बुडणार

डॉ. अद्वय हिरे यांच्या पक्षप्रवेशावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बरं झालं गद्दार गेले त्यांच्यामुळे हिरे सापडले. आजपर्यंत आम्ही खूप त्यांना पैलू पाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना काही पैलू पडलेच नाही, मग त्यांनाच आम्ही हिरे म्हणून नाचवल राहिलो, पण ते दगड गेले, बुडाले आणि बुडणार आहेत.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, एखाद्या पक्षावर विरोधीपक्षाने घाला घातला तर भाग वेगळा, पण एकेकाळाचा मित्र पक्षचं त्याचं कामकाज कसं चालतं हे अद्वय यांनी सांगितलं आहे. आम्ही 20 – 30 वर्ष भोगलं आहे. त्यांना सुद्धा आम्ही पालखीत बसवून मिरवणुका काढल्या पण पालखीत बसवून उदो उदो झाल्यानंतर त्यांना वाटायला लागली की, हे कायमचे आपले भोई आहेत. मी गहे कायम सांगितलं शिवसेना पक्षप्रमुखांनी जी शिवसेना स्थापन केली ती भाजपची पालखी वाहून नेण्यासाठी नाही, हिंदुत्वाची पालखी वाहण्यासाठी केली आहे, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष शिंदे गटाला टार्गेट केलं आहे.

आज त्यांचा जो किळसवाणा प्रकार सुरु आहे त्यामुळे तरुणांचा संभ्रम आहे की, राजकारण हे इतकं घाणेरडं आहे का? मी सांगतो कोणतही क्षेत्र घाणेरडं नसतं. त्या क्षेत्रातील चांगली किंवा वाईट माणसं त्याला चांगलं किंवा वाईट ठरवतात. त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशात जो अत्यंत घाणेरडा किळसवाणा पायंडा भाजपने पाडलेला आहे तो आपल्याला गाडून टाकायला आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला आहे.

अन्नाची शपथ घेणारेही तिकडे गेले

गद्दार लोकं हे स्वत;च्या स्वार्थासाठी जगताहेत त्यांना माणुसकी राहिलेली नाही. वापरा आणि फेका अशी वृत्ती आहे. त्या गद्दारानी अन्नाची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी अशी गद्दारी करणार नाही. तरी ते गेले, आता अन्नाची शपथ खरी असते, नसते. शपथ खरी असते नसते हा त्याचा अनुभव आणि प्रश्न आहे. पण आता केवळ मालेगाव पुरता काम करुन चालणार नाही, उत्तर महाराष्ट्र बघावा लागेल आणि सोबतच महाराष्ट्रातही फिरावं लागेल, असा आवाहनही उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

मालेगावात होणार जाहीर सभा

तुमचा उत्साह बघून महिन्याभरात मालेगावात सभा घेऊ, असं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात जाहीर केलं, तिथे मनमोकळेपणाने बोलता येईल, इथे छोटं छोटं बोलण्यापेक्षा तिथे मोकळ्या मैदानात बोलायचं आहे, असही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

महाराष्ट्रातील जनता आता निवडणुकांची वाट बघते आहे. त्यांचे सर्व्हे चालू आहेत. त्यांच्या सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीला किमान ३४ जागा मिळतील. मला वाटतं किमान हा शब्द त्यांनी घाबरून वापरला आहे. आपण एकत्र राहिलो तर कमीत कमी 40 जागा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही, असंही ठामपणे उद्धव ठाकरे म्हणाले.


ऑनलाइन रम्मी खेळण्यास प्रवृत्त करणाऱ्या कलाकारांवर गुन्हा दाखल करा, राष्ट्रवादीची मागणी