घरताज्या घडामोडीMumbai Corona Update: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार;...

Mumbai Corona Update: मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या २० हजार पार; ६ जणांचा मृत्यू

Subscribe

गेल्या २४ तासांत धारावीत १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या धारावीत ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पण यामधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये लक्षणे नसून कमी प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सध्याची मुंबईतील परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २० हजार ९७१ रुग्णांची नोंद झाली असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात धारावीत १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या धारावीत ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत आज आढळलेल्या २० हजार ९७१ रुग्णांपैकी १७ हजार ६१६ रुग्ण लक्षणेविरहित आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ७४ हजार ७८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ६४ हजार ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ९१ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात मुंबईत ७२ हजार ४४२ रुग्णांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ४० लाख ६४ हजार ५३७ चाचण्या झाल्या आहेत. आज आढळलेल्या रुग्णांपैकी १ हजार ३९५ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहे. तसेच ८८ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ऑक्सिजनचा वापर नगण्य असल्यामुळे मुंबईत लॉकडाऊन केला जाणार नाही, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट ८७ टक्के असून दुप्पटीचा दर ५६ दिवस आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Lockdown: …म्हणून मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही; पालिका आयुक्तांचं दिलासादायक वक्तव्य


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -