राज्यसभा, विधान परिषदेनंतर आता शिवसेनेचे मुंबई पालिका वाचवण्याचे प्रयत्न, बैठकांचा सिलसिला सुरु

जिल्हा प्रमुखांच्या पाठोपाठ आता शिवसेना नगरसेवकही एकनाथ शिंदे गळाला लागू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

MUMBAI

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत मोठी फूड पडली आहे. शिवसेनेचे जवळपास 40 हून अधिक आमदार बंडखोर शिंदे गटात सहभागी झालेत. तर इतरही आजी, माजी आमदार, नगरसेवक आणि विभागप्रमुख शिंदे गटाच्या संपर्कात आहेत. यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार, शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी आणि शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा बंड मोडून काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी स्थानिक पातळीवर शिवसेनेची मोठ बांधणी सुरु केली आहे. (after Rajya Sabha, mlc election, maharashtra political crisis Shiv Sena try to save Mumbai Municipal Corporation leader meeting start)

अलीकडेच राज्यातील राज्यसभा आणि विधान परिषदेत महाविकास आघाडी सरकारचा भाजपच्या फडणवीस नेतृत्त्वाने दारूण पराभव केला. या पराभवाचे खापर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर फोडण्यात आले. यात आता स्वत: पक्षातील बंडखोर आमदारांनीच मुख्यमंत्र्यावर अनके आरोप केले आहेत. मुख्यमंत्री तळागाळातील नेते आमदारांना भेट नाहीत त्यांना वर्षावर येऊ दिले जात नाही असे आरोप केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची पक्षावरची पकड निसटतेय असे दिसून येतेय. यात आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनाला पराभवापासून वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ऑन फिल्ड उतरून मोर्चा बांधणी सुरु केली आहे. यासाठी मुंबईतील मातोश्री बंगल्यापासून ते शिवसेना भवनावर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे.

गुरुवारी शिवसेनेच्या विभाग प्रमुखांची एका बैठक पार पडली. या बैठकीत विभाग प्रमुखांना आपल्या विभागावर मेळावे लावा, शाखा शाखा पिंजून काढा, आपण हिंदुत्व आणि मराठीच्या मुद्द्यांवर आजही काम आहोत. आपल्याला आणखीन ताकदीनं लढायचं आहे. त्यासाठी आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना जोर लावून पक्षबांधणीसाठी योगदान द्यावं लागेल. असे आदेश दिले आहेत.

तर आज शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनावर शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित झाले आहेत. तर मुख्यमंत्री ऑनलाईन पद्धतीने सर्वांशी संपर्क साधत आहेत.

यानंतर जिल्हा प्रमुखांच्या पाठोपाठ आता शिवसेना नगरसेवकही एकनाथ शिंदे गळाला लागू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची बैठक शिवसेना भवनात होणार आहे. नगरसेवकांनी आमदारांप्रमाणे आपली भूमिका बदलून यासाठी शिवसेनेकडून आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत. या बैठकांना शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याचे लागणार आहे.

यामुळे शिवसेनेने आता पुन्हा संघटना बांधणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. तसेच गाठीभेटींचे सत्र चालू केले आहे. यामुळे शिवसेनेच्या राज्यातील जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुखांच्या बैठकीत काय रणनीति ठरते तर दुसरीकडे नगरसेवकांनाही आज काय आदेश दिले जातात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे सत्ता नेतृत्त्वाला कोणता धोका निर्माण होऊ नये यासाठी शिवसेने पक्ष श्रेष्ठींकडून महापालिकेवर विषेश लक्ष केले आहे. यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर असताना नगरसेवकांनी बंड पुकारल्यास शिवसेनेला मोठी हानी होईल, तसेच अनेक नगरसेवक शिंदे गटात सामीन होण्याची भीती आहे. त्यामुळे पक्षाची पुढील रणनीति आखण्यासाठी आज शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे.


बंडखोर आमदारांच्या PSO, कमांडो आणि कॉन्स्टेबल यांच्यावर कारवाई होणार? प्रशासनाचे आदेश