Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण संभाजीनगर दंगलीबद्दल अजित पवारांनी केला नवा दावा, म्हणाले 'या' दोन गटात पेटला वाद

संभाजीनगर दंगलीबद्दल अजित पवारांनी केला नवा दावा, म्हणाले ‘या’ दोन गटात पेटला वाद

Subscribe

संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही एकाच समाजाची होती. ही दंगल दोन वेगवेगळ्या समाजाची नाही. ती अंतर्गत बाब आहे. तिथली परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम तिथल्या पोलिस यंत्रणेने केले आहे. -अजित पवार

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात बुधवारी मध्यरात्री दोन गटांत राडा झाला. या राड्याला काही जण उगाच धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. संभाजीनगरमध्ये झालेली दंगल ही एकाच समाजाची होती. ही दंगल दोन वेगवेगळ्या समाजाची नाही. ती अंतर्गत बाब आहे. तिथली परिस्थिती आटोक्यात आणण्याचे काम तिथल्या पोलिस यंत्रणेने केले आहे. त्यामुळे तिथे झालेल्या दंगलीला आम्ही विरोधी पक्ष म्हणून वेगळा रंग देता कामा नये आणि तसे प्रसारमाध्यमांनीही करु नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

संभाजीनगरमधील परिस्थिती नियंत्रणात 

जिथे राडा झाला ते छत्रपती संभाजीनगर असल्याने त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, तिथे झालेली दंगली ही एकाच समाजातील आणि आपापसातील होती. त्यामुळे काहींनी दोन समजातील वाद यादृष्टीने त्याकडे पाहिले. मी तिथले आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पदवीधर मतदार संघाचे आमदार सतिश चव्हाण, तसेच, काॅंग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष डाॅक्टर काळे यांच्याशी मी बोललो या तिघांनीही सांगितले की, इथली परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. पोलीस विभागाशीदेखील आम्ही संपर्क साधला. त्यांनी देखील तिथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे, अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

( हेही वाचा: भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, पाकिस्तानलादेखील ‘ही’ चूक मान्य )

धमकीचा तपास यंत्रणा करतील

अजित पवार यांनी संजय राऊत यांना आलेल्या धमकीबाबत म्हटले की, कोणाला धमकी आली असेल, तर ते त्याबाबत तक्रार दाखल करतील. आतापर्यंत अनेकांना धमक्या आल्या आहेत. नितीन गडकरीसह मुख्यमंत्र्यांपर्यंत धमक्या आल्या आहेत. याबाबत यंत्रणा तपास करतील. काही धमक्या या गंभीर असतात. तर काही धमक्या माथेफिरु लोक देत असतात. त्यामुळे याबाबत सरकार चौकशी करुन कारवाई करेल,असे अजित पवार यावेळी म्हणाले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -