हम बचेंगे भी और लडेंगे भी…, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

sanjay raut

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून तीनच दिवसांपूर्वी भाजपाच्या मदतीने सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे गटाने पहिल्या विजयाची नोंद केली. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, ‘हम बचेंगे भी और लडेंगे भी…’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे राहुल नार्वेकर आणि शिवसेनेचे राजन साळवी आमने- सामने होते. राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडला होता. तर राजन साळवी यांच्यासाठी काँग्रेसच्या संग्राम थोपटे यांनी प्रस्ताव मांडला. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत 164 मतांनी भाजपाचे राहुल नार्वेकर विजयी झाले. तर, राजन साळवी यांना आघाडीची 107 मते मिळाली. या निवडणूक प्रक्रियेत समाजवादी पक्षाचे दोन आणि एमआयएमचा एक आमदार तटस्थ राहिला. मनसेचे आमदार राजू पाटील तसेच बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्यासह तीन आमदारांनी राहुल नार्वेकर यांना मतदान केले.

हेही वाचा – राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंकडून घोषणा; भाजपचेही मानले आभार

शिंदे सरकारने मिळविलेल्या या पहिल्या विजयावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ‘शतरंज में वजीर और ज़िन्दगी में जमीर अगर मर जाए तो समझो खेल खत्म… हमारा वजीर और जमीर अभी जिंदा है… हम बचेंगे भी और लढेंगे भी… जय महाराष्ट्र,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा – राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय