घरठाणेEknath Shinde : कुठला डाव कधी टाकायचा, कोणाला पायचित करायचे...; शिंदेंचा रोख...

Eknath Shinde : कुठला डाव कधी टाकायचा, कोणाला पायचित करायचे…; शिंदेंचा रोख कोणाकडे

Subscribe

ठाणे : गुरुवारी कोपरी येथील तालुका क्रीडा संकुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, तालुका क्रीडा संकुलाचे काम मागील काही वर्षे रखडले होते. मात्र, आज हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा आनंद आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून खेलो इंडिया आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. (We know which innings to throw when who to base Who has Eknath Shinde cash)

हेही वाचा – U19 WC 2024 Final : भारताकडे वचपा काढण्याची संधी; 6 महिन्यांत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाशी भिडणार

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात आता नवीन फिटनेस पिढी तयार होत आहे. राज्य शासन खेळाडूंसाठी नवनवीन सुविधा देत आहे, त्यांच्यासाठी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच खेळातील बक्षिसांच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. आपण पालकमंत्री असल्यापासून खेळासाठी काम करत आहोत, येत्या काळात जिल्ह्यातून नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच दादोजी कोंडदेव स्टेडियमची पांढरा हत्ती ही ओळख आता पुसली गेली आहे, याठिकाणी आता रणजीचे सामने होत आहेत. ठाणे जिल्ह्याला खेळाचा जुना इतिहास आहे. आम्ही पूर्वी एकत्र व्यायामाला जात होतो, मात्र आता काळ बदलला आहे. पूर्वी खेळात निवडक संधी होत्या, मात्र आता अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि ही चांगली बाब आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Sea Link : मुंबईत होणार आणखी एक सागरी पूल, ‘या’ मार्गावरील प्रवास होणार सुखकर

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता एकनाथ शिंदे म्हणाले की, कुठला डाव कधी टाकायचा आणि कधी कोणाला पायचित करायचे हे आपल्याला ठाऊक आहे. दीड वर्षांपूर्वी आपण असाच एक कार्यक्रम केला होता. तेव्हापासून आतापर्यंत राज्यातील नकारात्मक शक्ती दूर सारून राज्य सकारात्मक दृष्टीने वाटचाल करत आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

सेंट्रल पार्कचे ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ नामकरण

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कोलशेत भागात 20.5 एकर जागेवर ग्रँड सेंट्रल पार्क बांधण्यात आले आहे. भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या मतदारसंघात हे भव्य सेंट्रल पार्क बांधण्यात आले असून, या पार्कचे ‘नमो सेंट्रल पार्क’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार केळकर यांनी या कार्यक्रमात केली होती. त्याप्रमाणे ग्रँड सेंट्रल पार्कचे ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ असे नामकरण करण्यात यावे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केली.

हेही वाचा – Mumbai : बोगनवेल सुशोभित करणार मुंबईतील उड्डाणपूल, मनपाच्या उद्यान विभागाचा अभिनव उपक्रम

ठाण्यात स्नो पार्क आणि ऑक्सिजन पार्क व्हावे 

ठाण्यात आता सेंट्रल पार्क पाठोपाठ एक स्नो पार्क (बर्फ उद्यान) ही विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. हे स्नो पार्क ही ठाणेकरांसाठी मेजवानी ठरेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी म्हटले की, शहरात आज ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याची गरज आहे. हे पार्क ऑक्सिजन देण्याचे काम करेल. पर्यावरणाचा समतोल न बिघडवता सरकारच्यावतीने सर्व प्रकल्प राबवले जात आहेत, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -