घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात रविवारी 44,388 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 206...

Maharashtra Corona Update: राज्यात रविवारी 44,388 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर 206 ओमिक्रॉनबाधित

Subscribe

राज्यात 24 तासात 206 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण शुक्रवारी राज्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली नव्हती. आज मात्र राज्यात 206 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात कोरोना आणि कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन रुग्णांची वाढती रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आजही वाढली असून राज्यातील मागील 24 तासात 44 हजार 388 नव्या कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. तर आज रविवारी दिवसभरात 12 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा 2.04 टक्के इतका आहे. त्याचप्रमाणे राज्यात रविवारी 24 तासात 15 हजार 315 रुग्णांची कोरोनावर मात केली आहेत. राज्यात आजपर्यंत 65 लाख 72 हजार 432 कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. राज्यातील सध्याचा रिकव्हरी रेट 94.98 टक्के इतका आहे.

राज्यात 24 तासात 206 ओमिक्रॉन बाधित

राज्यात 24 तासात 206 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण शुक्रवारी राज्यात एकही ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली नव्हती. आज मात्र राज्यात 206 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात 24 तासात206 ओमिक्रॉन बाधित यापैकी 115 रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय यांनी आणि 52 रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बाधित म्हणून घोषित केले आहेत. रुग्णाांचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

- Advertisement -

.

रुग्णाांचा तपशील खालीलप्रमाणे

  • साांगली-57
  • मुंबई -40
  • पुणे मनपा – 22
  • नागपूर-21
  • पिंपरी चिंचवड –15
  • ठाणे मनपा-12
  • कोल्हापूर- 8
  • अमरावती- 6
  • उस्मानाबाद-5
  • बुलढाणा आधण अकोला- प्रत्येकी 4
  • गोंदिया- 3
  • नांदुरबार, सातारा आधण गडधचरोली- प्रत्येकी2
  • औरंगाबाद, जालना, लातूर आधण मीरा भाईांदर- प्रत्येकी 1

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत रविवारी १९,४७४ कोरोनाबाधितांची नोंद, ७ जणांचा मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -