घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र'मंत्री असताना भुजबळांनी सरस्वतीचा फोटो का काढला नाही ?' : आ. फरांदे

‘मंत्री असताना भुजबळांनी सरस्वतीचा फोटो का काढला नाही ?’ : आ. फरांदे

Subscribe

नाशिक : छगन भुजबळ अडीच वर्षे मंत्री होते. त्यांनी सरस्वतीचा फोटो काढण्याची हिंमत का दाखवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर गेला की, समाजातील दोन वर्गांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांचे वक्तव्य हा याच प्रयत्नाचा भाग आहे, अशी टीका आमदार देवयानी फरांदे यांनी केली.

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावरून सध्या राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपकडून संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी भुजबळांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक मध्य विधानसभेच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही भुजबळांच्या या वक्तव्यावर टिका केली. आमदार फरांदे म्हणाल्या, काहीही संबंध नसताना छगन भुजबळ यांनी सरस्वती देवी विषयी जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी चुकीचे वक्तव्य केले. या वक्तव्यामागे हिंदुत्ववादी विचार व ओबीसी समाज यांच्यात दुही निर्माण करणे उद्देश आहे असा आरोप त्यांनी केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले हे अस्तिक होते.

- Advertisement -

देव देवतांवर त्यांची श्रद्धा होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे काव्य फुले काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर शंकर पार्वतीचे चित्र आहे. ओबीसी समाज हा हिंदू समाजाचा कणा आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी तो हिंदू धर्मापासून लांब जाणे शक्य नाही. सध्या महाराष्ट्रात नवरात्र महोत्सव सुरू असताना सगळीकडे आदिशक्तीचा गजर सुरू असताना, अशा प्रकाराची टीका करून समाजातील वातावरण गढूळ करण्याचा हा प्रयत्न असून याचा करावा तितका निषेध कमी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सत्ता गेल्या आठवण का झाली

सत्ता गेल्यानंतर नीलम गोर्‍हे यांना महिलांची आठवण झाली का? असा सवाल आमदार देवयानी फरांदे यांनी नीलम गोर्‍हे यांनी महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था याबाबत देशात दुसरा नंबर लागल्याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आ. फरांदे म्हणाल्या, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था खराब होण्यासाठी ठाकरे सरकारच जबाबदार असल्याचे सांगताना महाराष्ट्रातील रेट ऑफ कन्वेक्शन 60 टक्के वरून 4० टक्के पर्यंत कमी कसा झाला? मागील सरकार हे वसुली सरकार होते असा आरोप करताना राज्यातील गृहमंत्री व पोलीस आयुक्त यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊन गृहमंत्री अद्यापही जेलमध्ये असल्याची आठवण आमदार फरांदे यांनी करून दिली. दाऊदशी संबंध असणार्‍या नबाब मलिकांना जेलमध्ये असतानाही मंत्रीपद कायम ठेवले होते याची आठवण करून देताना यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले नाही का ? असा प्रश्न देखील आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -