घरताज्या घडामोडीLive Update: मुंबईत २४ तासात ४४१ कोरोनाबाधितांची नोंद, ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Live Update: मुंबईत २४ तासात ४४१ कोरोनाबाधितांची नोंद, ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Subscribe

मुंबईत २४ तासात ४४१ कोरोनाबाधितांची नोंद, ८ कोरोना रुग्णांचा मृत्यू तर मागील २४ तासात ६०० रुग्णांची कोरोनावर मात (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा )


राज्यात गेल्या २४ तासात ७,२४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,७२,६४५ झाली (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा )

- Advertisement -

CNG, PNG price hike मंगळवार मध्यरात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. सीएनजीमध्ये २.५८ प्रति किलो तर पीएनजी गॅसची किंमत ०.५५ रुपये प्रति युनिटने वाढणार आहे. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


NEET PG Exam 2021 नीट पीजी परीक्षा ११ सप्टेंबरपासून होणार, केंद्रीय मंत्री मनसूख मांडवीया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच एनटीएकडून वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. (सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा)

- Advertisement -

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी भेट घेतली आहे. यावेळी अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली असल्याची माहिती दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी देशाचा गौरव वाढवा असे मोदींनी खेळाडूंना सांगितले आहे. टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातील खेळाडूंनीही सहभाग घेतला आहे. या खेळाडूंशी मोदींनी संवाद साधला आहे. तसेच खेळाडूंच्या कुटुंबीयांशीही ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला.


झोटिंग समिती हा निव्वळ फार्स होता का? नाना पटोलेंचा सवाल ( सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा)


काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली. (सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक कर)


भाजप नेत्या पंकजा मुंडे दिल्लीतून परतल्या समर्थक आणि कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांचे राजीनामा नामंजूर केल्याचे जाहीर केले. आपलं घर का सोडायचं, असा सवाल पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केला आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

  • फक्त आमदारकी आणि मंत्रीपदासाठी राजकारणात नाही – पंकजा मुंडे
  • माझ्यावर निर्भय राजकारणाचे संस्कार झालेत – पंकजा मुंडे
  • लोकांची काम करण्यासाठी मी राजकारण आले – पंकजा मुंडे
  • सत्ता आणि खुर्चीची लालसा नाही – पंकजा मुंडे
  • मंत्रीपदाची मागणी हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत – पंकजा मुंडे
  • माझे कार्यकर्ते हिच माझी शक्ती – पंकजा मुंडे
  • मला संपवायचा प्रयत्न केला तरी मी संपले नाही – पंकजा मुंडे
  • मी कोणालाच भीत नाही – पंकजा मुंडे
  • पक्षाने जे दिलं नाही ते कार्यकर्ते लक्षात ठेवतात – पंकजा मुंडे
  • मला सत्तेची लालसा नाही, कुणालाही संपवून राजकारण करायचं नाही; पंकजा मुंडे कडाडल्या (सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा)
  •  मला दबावतंत्र वापरायचं नाहीय; पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांचे राजीनामे केले नामंजूर (सविस्तर वाचा)

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज इलेक्ट्रिक व्हेईकलबाबतचे धोरण जाहीर करणार आहेत.


देशात २४ तासांत देशात ३१ हजार ४४३ नवे कोरोनाबाधित आढळले आहे. तसेच आता देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात सक्रिय रुग्णसंख्या आता ४ लाख ३१ हजार ३१५ झाली असून गेल्या १०९ दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे.


भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले आहे. वयाच्या ६६व्या वर्षी यशपाल शर्मा यांनी अखेरचा श्वास घेतला. १९८३च्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे यशपाल शर्मा सदस्य होते. भारती निवड समिती सदस्य म्हणूनही शर्मा यांनी जबाबदारी पार पाडली आहे.


काल, सोमवारी रात्रीपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत आहे. सर्व नद्या दुधडी भरून वाहत आहे. रत्नागिरीतील काजळी नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. यामुळे रत्नागिरीतील अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडून रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट दिला आहे.


अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी चौकशीत ५ कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. या ५ कोटी रुपयांपैकी ४.२ कोटी रुपये अनिल देशमुख यांना दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. पण अद्याप ८० लाख रुपयांचा हिशेब नाही. सचिन वाझेच्या चौकशीतून ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.


खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सध्या मुंडे समर्थक आणि कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र सुरू आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आता दिल्लीहून आज परतणार आहेत. माहितीनुसार यावेळेस मुंडे समर्थक पंकजा मुंडे यांना भेटून मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीवारीत राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीमध्ये पंकजा मुंडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली.


जगभरात अद्याप कोरोनाचा कहर कायम आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगातील कोरोनाबाधितांची संख्या १८ कोटी ८० लाख ४८ हजार पार गेली आहे. यापैकी आतापर्यंत ४० लाख ५५ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १७ कोटी १९ लाख ८५ हजारांहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -