घरताज्या घडामोडीएखाद्याला मुलगा झाल्यास श्रेय घेताना म्हणतात, आमच्या..., फडणवीसांचा मविआ नेत्यांना टोला

एखाद्याला मुलगा झाल्यास श्रेय घेताना म्हणतात, आमच्या…, फडणवीसांचा मविआ नेत्यांना टोला

Subscribe

ठाण्यातील दुर्गाडी पुलाच्या कामाचे श्रेयसुद्धा खेचून घेण्यात आले असल्याची नाराजी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच ठाण्यात आणि कल्याणमध्ये जर काम केले असेल तर ते ओरडून सांगण्याची वेळ आली असे खासदार पाटील म्हणाले.

श्रेयवादावरुन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. नेते मंडळी काही झाले तर श्रेय घेत असतात. एखाद्याच्या घरात मुलगा झाला तर ते आमच्या कृपेनेच झाला असल्याचे म्हणतात आणि श्रेय घेत असतात. राज्य सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये भ्रष्टाचारावरुन आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता देवेंद्र फडणवीसांनी श्रेय घेण्यावरुन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. फडणवीस ठाण्यातील विकास कामांचे लोकार्पण करण्यासाठी ठाणे दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात संबोधित केले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या हस्ते ठाण्यातील कै. वसंतराव डावखरे प्रेक्षक गॅलरी, दिव्यांग स्नेही उद्गयान आणि इतर विकासकामांच्या लोकार्पणासाठी आणि भूमिपूजनासाठी गेले होते. ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही फडणवीसांनी अभिवादन केलं आहे. दरम्यान एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाविकास आघाडीच्या नेत्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे.

- Advertisement -

एखाद्याला मुलगा झाल्यास श्रेय घेतात

भाजप आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील मोडकळीस आलेल्या अधिकृत इमारतींबातच्या निमांना मंजुरी मिळवून घेतली होती. परंतु याची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई झाली. या कामांचे श्रेय घेण्यासाठी अंमलजबाणी रखडवली गेली का? असा सवाल फडणवीसांनी केला आहे. तसेच अलीकडच्या काळात काही लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की, कशाचेही श्रेय ते घेतात, एखाद्याच्या घरात लग्न असेल तर तसेच एखाद्याच्या घरात मुलगा झाल्यास तो आमच्या प्रेरणेने झाला. अशा प्रकारचे वेगवेगळे श्रेय घेण्याचे अनेकांचा प्रयत्न असतो. ज्याचे त्याचे श्रेय हे ज्याला त्याला मिळत असते आणि लोक ते देत असतात. आपण फक्त काम करत राहायचे असते असा टोला फडणीसांनी लगावला आहे.

दरम्यान ठाण्यातील भाजप आमदार आणि खासदारांनी श्रेय घेण्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. ठाण्यातील दुर्गाडी पुलाच्या कामाचे श्रेयसुद्धा खेचून घेण्यात आले असल्याची नाराजी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच ठाण्यात आणि कल्याणमध्ये जर काम केले असेल तर ते ओरडून सांगण्याची वेळ आली असे खासदार पाटील म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : गोवेकर, भिसे, अंकुश राणे, श्रीधर नाईकांच्या खुनामागे कोण?, विनायक राऊतांचा राणेंवर पलटवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -