‘क्रांती गाथा’चे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणं चांगला मुहूर्त, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना क्रांती गाथा या दालनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणं हा चांगला मुहुर्त आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ‘क्रांती गाथा’ या दालनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणं हा चांगला मुहुर्त आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. मुंबईतील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांती गाथा भूमिगत दालनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. (It is a good moment for us to inaugurate ‘Kranti Gatha’ by Narendra Modi)

हेही वाचा – विविध क्षेत्रातून महाराष्ट्राने देशाला प्रेरित केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जे आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत ते मिळवण्यासाठी आपल्या क्रांतीकारांनी बलिदान दिलं आहे. मरणप्राय यातना सहन केल्या आहेत. त्यांनी हे सहन केलं नसतं तर आपण स्वातंत्र्य झालो असतो का? असा सवाल करत आपल्याला कोणीही स्वातंत्र्य आंदण दिलेलं नाही, ते लढून मिळवावं लागलं. त्यामुळे या स्वातंत्र्यासाठी ज्ञान-अज्ञान क्रातिकारकांना समर्पित अशा क्रांती गाथा या भूमिगत दालन तयार करण्यात आलं आहे.

२०१६ मध्ये हे राजभवनात हे भुयार सापडल्यानंतर तत्कालिन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मला बोलावले होते. त्यावेळी या भुयाराचं काय करायचं हा प्रश्न होता. पण आता या भुयाराचं क्रांती गाथा दालन झाल्याचं पाहुन फार आनंद होतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

महाराष्ट्र सरकारनं १ मे रोजी प्राथमिक स्वरुपात एक पुस्तक तयार केलं आहे. ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांच्या इतिहासांचं स्मरण होण गरजेचं आहे. क्रांतीकारकांनी आपल्या देशासाठी ज्या गोष्टी केल्या आहेत. त्याच्या एक कण जरी आपण काम केलं तर ते कृतार्थ होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

काळ बदलत असला तरी या वास्तुतील इतिहासाच्या खूणा जपत हे काम करण्यात आलं आहे. जलभूषणचं नुतनीकरण कलात्मक नजरेतून करण्यात आलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या दालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचं भाग्य मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.