घरताज्या घडामोडीटॉप्स ग्रुप प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला; प्रताप सरनाईकांना दिलासा

टॉप्स ग्रुप प्रकरणातला क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारला; प्रताप सरनाईकांना दिलासा

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन लिमिटेडच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन लिमिटेडच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. टॉप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याची माहिती विशेष पीएमएलए न्यायालयाला दिली. तसेच, त्यांनी पोलिसांनी तपास दफ्तरबंद करण्यासंदर्भात दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्यामुळे सरनाईक यांच्यामागील ईडीचा ससेमिरा बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (mla pratap sarnaik court accepted closure report against tops group)

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एम. एस.बडे यांनी 14 सप्टेंबर रोजी पोलिसांनी दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळे मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट स्वीकारल्याने आमदार सरनाईकांसाठी दिलासा मानला जात आहे. दरम्यान, याच प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून आमदार प्रताप सरनाईक यांची चौकशी केली होती.

- Advertisement -

दरम्यान, क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने स्वीकारल्याने मूळ गुन्हा रद्द झाला आहे. त्यामुळे पीएमएलए अंतर्गत ईडीने दाखल केलेला गुन्हा टिकू शकत नाही. त्यामुळे आपल्याला दोषमुक्त करण्यात यावे, असा अर्ज कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक एम. शशिधरन यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात केला आहे.

नेमके प्रकरण काय?

- Advertisement -

आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह अमित चंदोले आणि एम. शशिधरन यांच्यावर टॉप्सग्रुप सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स लिमिटेड प्रकरणात आरोप करण्यात आले होते. शिवाय, या कंपनीवर भ्रष्टाचार करून एमएमआरडीएला सुरक्षा रक्षक पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप होता. या कंत्राटातून होणाऱ्या आर्थिक फायद्याचा मोठा हिस्सा आमदार प्रताप सरनाईक यांना देण्यात आला. याच प्रकरणाच्या आधारे ईडीने सरनाईक यांचे निकटवर्तीय एम. शशिधरन आणि अमित चंदोले यांना अटक केली.


हेही वाचा – दसऱ्याला शिवाजी पार्क सुने-सुने; कायदा सुव्यवस्थेमुळे दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -