LIC चे 50 हजार कोटी बुडाले, तरी सरकार म्हणत ‘ऑल इज वेल’; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

shiv sena leader sanjay raut attack pm narendra modi mumbai visit and adani issue in parliament

हिंडेनबर्ग अहवालानंतर धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानीकडून परत घ्यावा अशी मागणी जोर धरतेय. या मागणीवरून आज शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. LIC चे 50 हजार कोटी बुडाले, हा जनतेचा पैसा डुबला आहे, तरी सरकार म्हणतं ऑल इज वेल, काही घडलं नाही, हा निर्लज्जपणा आहे, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राऊत म्हणाले की, धारावीतील जनतेचं, झोपडपट्टी धारकांचं हे दुर्दैव आहे की, वारंवार घरं मिळण्यापासून त्यांना वंचित ठेवलं जात आहे. त्यांना घरं मिळावीत, ते चांगल्या ठिकाणी राहायला जावेत, ही शिवसेनेची पहिल्यापासून भूमिका आहे, परंतु यासंदर्भात काही वेगळी भूमिका परत येत असेल तर त्यासंदर्भात वरिष्ठांची चर्चा करावी लागेल.

काँग्रेस हे आंदोलन देशभरात करत आहे, आज त्यांचं आंदोलन अदानी कार्यालयासमोर होत आहे, कारण एलआयसीचा 50 हजार कोटींचा आकडा आहे, हे नुकसान एलआयसीचं झालं आहे. जिंदगी के पहिले भी जिंदगी के बाद भी एवढा विश्वास एलआयसीवर होता. गेल्या 67 वर्षात एलआयसीचं एक रुपयाचही नुकसान झालं नव्हंत. नेहरुंचा काळ असेल, इंदिरा गांधींचा, लाल बहादुर शात्री, व्ही. पी. सिंग, नरसिंहराव किंवा मनमोहन सिंगाचा काळ असेल, या 67 वर्षांच्या काळात एलआयसीचं एक रुपयाचंही नुकसान झालं नाही. पण गेल्या 7 वर्षांत 50 हजार कोटींचं नुकसान झालं आहे, असा आरोपही राऊतांनी केला आहे.

अदानी हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचेही मित्र आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर राऊत म्हणाले की, राष्ट्रहिताचा प्रश्न येतो. तेव्हा कोणी कुणाचा मित्र नसतो. अशावेळी कोण कुणाचा मित्र आहे हे पाहात आहात. अशावेळी पंतप्रधानांनी तोंड उघडायला पाहिजे. या देशाच्या पंतप्रधानांनी यावर बोलायला हवं. तुम्ही आमच्याकडून काय अपेक्षा करताय? असा सवाल राऊत यांनी केला.

अमृत काळात महाघोटाळा, राऊतांचा आरोप 

आज सर्व नेते विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या चेंबरमध्ये जमून बैठक घेणार आहे. यासंदर्भात एकत्र बसून निर्णय घेणार आहे. यानंतर सकाळी 10.30 वाजता सर्व विरोक्ष नेते संसदेतील गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करणार आहोत आणि या देशातील जो प्रश्न आहे… हे सरकार ज्याला अमृत काळ म्हणते, या अमृत काळात जो महाघोटाळा समोर आला, त्या महाघोटाळ्यामध्ये आजपासून सुरु झालेल्या संसदेच्या अधिवेशनात कोणती पावलं टाकावी, कोणती भूमिका घ्यावी यावर आज निर्णय घेऊ. जो निर्णय सर्व विरोधी पक्ष एकत्र बसून घेईल, तो शिवसेनेला मान्य असेल, असही राऊत म्हणाले.


नितेश राणेंनी स्वीकारले सुप्रिया सुळेंचे आव्हान; नेमकं काय आहे प्रकरण?