घरराजकारणचंद्रकांत पाटलांच्या 'त्या' वक्तव्याची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल, संबंधित व्हिडीओ हटवला?

चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याची केंद्रीय नेतृत्वाकडून दखल, संबंधित व्हिडीओ हटवला?

Subscribe

मुंबई : पनवेल येथे प्रदेश भाजपा कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीत मार्गदर्शन करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या वक्तव्याची दखल थेट राष्ट्रीय नेतृत्वाने घेतली आणि त्यामुळे सोशल मीडियावरून हा व्हिडीओ हटविण्यात आल्याचे सांगण्यात येते.

ठाकरे सरकारच्या काळत हिंदुत्व संपविण्याचा प्रयत्न झाला. यासाठी नवीन सरकार येणे गरजेचे होते. स्थिरता देऊ शकेल अशी एका नेत्याची गरज होती. पण अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. दु:ख झाले असले तरी, ते पचवून आनंदाने पुढे जायचे आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश भाजपा कार्यकारिणीत सांगितले. त्यामुळे नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता होती. विशेषत:, भाजपाच्या मदतीने राज्यात सत्तेवर बसलेल्या शिवसेनेच्या फुटीर गटाला ते रुचणारे नव्हते. याची दखल केंद्रातील पक्षश्रेष्ठींनी यासंबंधीचा व्हिडीओ हटविण्याची सूचना दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

शरद पवारांची टीका
मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रतिक्रिया विचराली असता, त्यांनी दगड डोक्यावर ठेवायचा की छातीवर… हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असे उत्तर दिले.

याआधीही पाटील यांच्या वक्तव्यावरून वादंग
ओबीसी आरक्षणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर्षी मे महिन्यात भाजपावर टीका केली होती. या टीकेली उत्तर देताना पाटील यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा, अन्यथा मसणात जा, पण आरक्षण द्या, अशी टीका त्यांनी केली होती. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झााला होता. राज्य महिला आयोगाकडे याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती. तथापि, पाटील यांनी राज्य महिला आयागोला पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आणि या वादावर पडदा पडला होता.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -