घरराजकारण'तो त्यांचा आवडता शब्द' अजित पवारांचा शिंदे - फडणवीसांना खोचक टोला

‘तो त्यांचा आवडता शब्द’ अजित पवारांचा शिंदे – फडणवीसांना खोचक टोला

Subscribe

शपथविधी पार पडल्यानंतर अद्याप खातेवाटप झालेलं नाही यावरूनच विरोधी नेत्यांकडून शिंदे - फडणवीस सरकारवर टोलेबाजी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या नव्या सरकारवर खोचक टोला लगावला.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या प्रमाणावर राजकीय गदारोळ झाला. याजकीय भूकंपामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे – फडणवीस(shinde – fadnavis) यांचं नवीन सरकार राज्यात स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळच्या विस्ताराला मुहूर्त मिळत नव्हता पण आखेर 9 ऑगस्ट रोजी भाजपचे 9 आणि शिंदे गटाचे 9 अश्या 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी पार पडल्यानंतर अद्याप खातेवाटप झालेलं नाही यावरूनच विरोधी नेत्यांकडून शिंदे – फडणवीस सरकारवर टोलेबाजी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या नव्या सरकारवर खोचक टोला लगावला.

हे ही वाचा – संजय राऊतांचं तुरुंगातही वाचन-लिखाण सुरूच, वाचा दिनक्रम!

- Advertisement -

उशिरा का होईना मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. पण अजूनही खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपाला उशीर का होतो. त्याच नेमकं कारण काय आहे ते शिंदे आणि फडणवीसांनाच माहिती असेल. असं अजित पवार म्हणाले. ‘खरंतर खूप लवकर खातेवाटप व्हायला हवं होतं. 17 तारखेला अधिवेशन सुरु होत आहे आणि आज 13 तारीख आहे. अधिवेशनात प्रश्न विचारले जातात. प्रश्नाला उत्तर म्ह्णून त्या विभागाचे मंत्री म्हणून संबंधितांचं नाव येतं’. पण खाटेवाटप अजूनही काय झालं नाही यांचं नेमकं कारण काय आहे ते त्या दोघांनाच माहित असले’. असं अजित पवार म्हणाले. दरम्यान अजित पवार(ajit pawar) पुण्यात पत्रकार परिषद घेत असताना म्हणाले.

cabinet expansion

- Advertisement -

हे ही वाचा – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पुन्हा कोरोनाची लागण

याच विषयावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘शिंदे आणि फडणवीसांचा एक आवडता शब्द आहे. आणि तो म्हणजे ‘लवकरात लवकर’ ! लवकरात लवकर खातेवाटप होणार असं फडणवीसांचं वक्तव्य मी ऐकलं होतं असाही अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे साताऱ्यात त्यांचा गावी गेले होते तेव्हा सुद्धा हेच म्हणाले होते की लवकरात लवकर खातेवाटप होईल’. असं ही अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा – चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी

‘बाळासाहेब ठाकरेंनी(balasaheb thackeray) मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना करून मुंबईत शिवसेनेची पाळंमुळं घट्ट रोवली. पण ती शिवसेना फोडण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना फार कमी वेळ याहस मिळालं. पण नंतर कुणीही निवडून आलं नाही. असा खोचक टोला सुद्धा अजित पवार यांनी एकनाथ शिंदे गटावर केला.

हे ही वाचा – देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम आजपासून सुरू; जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याबाबतचे महत्त्वाचे नियम

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -