घरमहाराष्ट्र'राज्यातील सत्ताबदलाच्या हालचालींशी भाजपचा संबंध नाही, प्रस्ताव आल्यास...' चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

‘राज्यातील सत्ताबदलाच्या हालचालींशी भाजपचा संबंध नाही, प्रस्ताव आल्यास…’ चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संजय राऊत सकाळी जे सकाळी म्हणतील ते सांयकाळी म्हणतील याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते मी सांगू शकत नाही. असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे

शिवसेने नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे बंडखोर शिवसेना आमदारांसह सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. दरम्यान शिवसेनेचे निम्म्याहून अधिक मंत्री शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर शिंदे आता राज्यपालांना संख्याबळाबद्दलचं पत्र देणार आहेत. एकूणचं महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भीतीने आघाडीतील नेत्यांनी बैठकांचे सत्र सुरु केले आहे. याच संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनावर स्पष्ट बोलणे टाळले आहे. मात्र राज्यातील सत्ताबदलाच्या हालचालींशी भाजपचा संबंध नाही, मात्र सत्तास्थापनेचा प्रस्ताव आल्यास १३ सदस्यांची कमिटी खल करून केंद्राला पाठवेल असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

राज्यात सुरु असलेल्या या घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही. कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास १३ सदस्यांची कमिटी बसते. खल करते एकमत करते आणि केंद्राला पाठवते. केंद्रचं संसदीय सदस्य अशा सगळ्या गोष्टींवर निर्णय घेते. भाजपकडून नियोजित काम सुरु आहे. महाराष्ट्रातील 16 मतदार संघ असे काढले आहेत की, जिथे लक्ष केंद्रीत करायचे आहे. तिथे १६ प्रवासी कार्यकर्ते त्यांचा प्रवासी करत आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंचा प्रवास सुरु आहे. राज्यात चाललेल्या घटनांशी मात्र भाजपशी काही संबंध नाही. अस स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

- Advertisement -

राज्यात सत्ता परिवर्तनाच्या दिशेने सुरु असल्याबद्दल काही माहिती नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत जाणे नियोजित आहे. दिल्लीत अनेक कार्यकर्त्यांची अनेक कामं असतात. बऱ्याच विषयांवर केंद्रीय नेत्यांशी चर्चा करायची असते. राज्यात सुरु असलेल्या या घटनांशी भाजपचा काहीही संबंध नाही. असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे. या देशात अभिव्यक्ती स्वतंत्र्य आहे. पण शरद पवारांना आणि संजय राऊतांना जरा जास्त आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये त्यांना काही म्हणता येतं. त्यामुळे ते काहीही बोलत असतात. असा टोला पाटील यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाजपाच्या पाठींब्या संदर्भात केलेल्या विधानावर पाटील म्हणाले की,  राष्ट्रीय पक्ष खूप आहेत. नेमका त्यांना राष्ट्रीय पक्ष कोणता म्हणायचा आहे त्यांनाच विचारा.

- Advertisement -

भारतीय जनता पार्टीची भूमिका महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून मी मांडत असतो. पण आमच्या एखाद्या नेत्यांना उत्तर देण्याचे अधिकार आहेत. राज्यातील सत्तापरिर्तानाशी मी अनभिज्ञ आहे, त्यामुळे कोण आमदार गेलेत, किती गेलेत, कोण माघारी येणार आहेत, कोणाला आनंद होणार आहे, हे काही मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. मोहित कंबोज सर्वांचा मित्र आहे. एकनाथ शिंदेंचा पण मित्र आहे. मोहित कंबोज जगाचा मित्र आहे. त्याचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेत मित्र आहे. असही पाटील म्हणाले.

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? यावर प्रश्नावर प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संजय राऊत सकाळी जे सकाळी म्हणतील ते सांयकाळी म्हणतील याची शाश्वती नाही. त्यामुळे त्यांना काय म्हणायचं ते मी सांगू शकत नाही. असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला आहे.


शरद पवारांविषयी भाजपची ही अधिकृत भूमिका आहे का? राणेंच्या धमकीनंतर राऊतांचा मोदींना सवाल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -