घरCORONA UPDATEcoronavirus live update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

coronavirus live update : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असून यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह बिहारवासियांचाही जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

मुंबईमध्ये गेल्या २४ तासांत १ हजार १८० कोरोनाबाधितांचे नवे रुग्ण आढळून आले असून १ हजार ०७१ जण या आजारातून बरे झाले आहेत. तर ६८ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ८२ हजार ८१४ इतकी झाली आहे. तर ५३ हजार ४६३ जण बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये २४ हजार ५२४ अॅक्टिव्ह केसेस असून ४ हजार ८२७ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. ही माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. (सविस्तर वाचा)

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार ०७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून २९५ जणांना मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाबा म्हणजे राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांच्या वर गेला असून आतापर्यंत ८ हजार ६७१ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. (सविस्तर वाचा)


तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी, ४ जुलै रोजी वाढ झाली असून सप्तशृंगी गड येथील चार तर अभोण्यातील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. चार दिवसांपूर्वी सप्तशृंगी गडावरील एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. सप्तशृंगी गडावर हा पहिलाच रुग्ण आढळला होता. अभोण्यातही मागील आठवड्यात एका शासकीय कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. (सविस्तर वाचा)


मुंबईतील धारावी परिसरात कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले असून २ दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.


कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती, रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधीत आजार तसेच हृदयविकार, श्वसनविकाराचा त्रास असलेल्या ५० वर्षांहून अधिक वयाच्या शासकीय महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना मानवतेच्या दृष्टीकोनातून घरातून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. यासंदर्भात राजपत्रित अधिकारी महासंघाने यशोमती ठाकुर यांना निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी कोरोना संकट काळात महिला सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भेडसावत असलेल्या अडचणीची माहिती दिली आहे.


शनिवार संगमनेरकरांसाठी धोकादायक ठरला आहे. संगमनेरमध्ये तब्बल तेरा नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. यात शहरातील तीन तर तालुक्यातील दहा रुग्णांचा समावेश आहे. यातील आठ रुग्ण कुरण गावातील असल्याने हे गाव कोरोनाचे हाॅटस्पॉट म्हणून पुढे येत आहे. आतापर्यंत कुरणमध्ये सोळा रुग्ण आढळले असून हे गाव प्रशासनालादेखील सहकार्य करत नसल्याचे समोर येत आहे. (सविस्तर वाचा)


कोरोना महामारीच्या संभाव्य रोगांच्या लसीच्या विकासासाठी आयसीएमआरची प्रक्रिया तंतोतंत जागतिक स्तरावर स्वीकारल्या गेलेल्या मानदंडानुसार होत आहे. ज्यात मानवी आणि प्राण्यांचा चाचणी समानांतर चालू राहू शकतात, असे आयसीएमआर म्हटले आहे.


नगर जिल्ह्यातील आमदाराला कोरोनाची लागण

कोरोनाचा फैलाव राज्यात मोठ्या प्रमाणावर होत असून आता आमदार देखील याच्या कचाट्यात सापडू लागले आहेत. नगर जिल्ह्यातील एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाला दुपारपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालामध्ये २४ नवे रुग्ण आढळले होते. दरम्यान, रात्री आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात पुन्हा दहा रुग्ण कोरोनाबाधित आढळले. यात सत्ताधारी पक्षाच्या जिल्ह्यातील एका आमदाराचा समावेश आहे. या आमदारावर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. (सविस्तर वाचा)


राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांचे ‘कोरोना’मुळे निधन

पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. शनिवारी आज, सकाळी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनाच्या बचावासाठी सोन्याचं मास्क! किंमत तर बघा!

देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने रूग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे. या काळात लोकांच्या जीवनात एक गोष्ट कायमची जोडली गेली आहे, ती म्हणजे मास्क. कोरोना संक्रमणाच्या या काळात मास्क प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लोक त्यांच्या स्वत: च्या आवडीनुसार वेगवेगळे मास्क डिझाइन करत आहेत. (सविस्तर वाचा)


अखेर मुंबईतले २ किलोमीटरचे निर्बंध हटवले!

२ किलोमीटरचे निर्बंध शासनाने हटवले. आसपासच्या परिसरात जाण्यावरचे निर्बंध हटवले. मात्र, शहरभर प्रवास करण्यावर बंदी कायम असणार. आसपासच्या परिसराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केल्यास गाडी जप्तीची देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या निर्णयाचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. ‘ही २ किलोमीटरची अट कशाच्या आधारावर आली माहीत नाही. अनलॉकच्या काळात लोकांना इतर कामं करायची आहेत. साध्या कामासाठी घरातून बाहेर पडलो, तरी सहज २ किलोमीटरच्या बाहेरचा प्रवास होतो. पण आता ती अट रद्द करण्यात आली हा योग्य निर्णय आहे’, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान, या निर्बंधाशिवाय इतर अटी मात्र मुंबईत कायम असणार आहेत. (सविस्तर वाचा)


अनिल थत्तेना ‘कोरोना’ची लागण

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तसेच देशातील कोरोनाबाधितांनी सहा लाखाचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील पोलीस प्रशासन, वैद्यकीय प्रशासनाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता बिग बॉस फेम अनिल थत्ते यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. खुद्द अनिल थत्ते यांनीच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. (सविस्तर वाचा)


Corona: ‘या’ नामांकित कंपनीने बंद केलं मुंबईचे ऑफिस

देशव्यापी लॉकडाऊनमुळे बर्‍याच आर्थिक नुकसानानंतर अनेक लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बऱ्याच कंपन्यांनी आपली ऑफिसे भाड्याने दिली आहेत किंवा ती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. CNBCTV 18 ला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, अ‍ॅपवर आधारित मुंबईकरांना भाड्याने टॅक्सी सेवा पुरविणारी अमेरिकन कंपनी उबर (UBER) ने भारतातील मुंबई ऑफिस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (सविस्तर वाचा)


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई आणि पनवेल दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी कोविड रुग्णांना भेट देत स्थानिक प्रशासनाची चर्चा देखील केली. यावेळी ते म्हणत होते की, ‘एमएमआर क्षेत्रात टेस्टिंगची संख्या वाढवणे गरजे आहे. तसेच पालिका – राज्य सरकारमध्ये उत्तम समन्वय असणे फार गरजेचे आहे. तसेच गेल्या चार महिन्यांत पोलिसांवर प्रचंड ताण आला आहे’, असे देखील ते पुढे म्हणाले.

दरम्यान, ‘नॉन कोविड रुग्णांच्या अडचणी दूर झाल्या नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच खासगी रुग्णालयाकडून रुग्णांना वाढीव बिल दिली जात आहेत. विशेष म्हणजे व्हेंटिलेटर खरेदीची सरकारची पद्धत मंद गतीची असल्याचा हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बदल्यांविषयी विचारणा केली असता फडणवीसांनी आयुक्तांच्या बद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे.


पिंपरी – चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. शनिवारी आज, सकाळी चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. (सविस्तर वाचा)


राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ६ हजार ३६४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून १९८ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ९२ हजार ९९०वर पोहोचला असून मृतांचा आकडा ८ हजार ३७६ झाला आहे. तसेच मागील २४ तासांत ३ हजार ५१५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १ लाख ४ हजार ६८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ५४.२४ टक्के एवढा आहे.


मुंबईत शुक्रवारी १ हजार ३७२ नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ८१ हजार ६३४वर पोहोचला असून आतापर्यंत यापैकी ४ हजार ७५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज मुंबईत १ हजार ६९८ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ५२ हजार ३९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोनाचे १ हजार १३९ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ५६ हजार ५२१ वर पोहोचला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -