घरताज्या घडामोडीथोडक्यात टळला अनर्थ, अन्यथा...; मालगाडीचे इंजिन थेट घुसले शेतात

थोडक्यात टळला अनर्थ, अन्यथा…; मालगाडीचे इंजिन थेट घुसले शेतात

Subscribe

मालगाडी थेट शेतात घुसून मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरात घडली आहे. सोलापूरच्या करमाळ्यात एक मालागाडीचे इंजिन शेतात घुसले, त्यानंतर मालगाडीचे काही डबेही रुळावरून सरकले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मालगाडी थेट शेतात घुसून मोठा अपघात झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरात घडली आहे. सोलापूरच्या करमाळ्यात एक मालागाडीचे इंजिन शेतात घुसले, त्यानंतर मालगाडीचे काही डबेही रुळावरून सरकले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रेल्वेचे इंजिन कोसळून इतर डबेही रुळावरून घसरल्याने मालगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (karmala good trains accident both engines of train stuck in farm and good boogies)

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातल्या केम गावाजवळ मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेचा अपघात झाला. मालवाहू गाडीचे रेल्वे इंजिन थेट शेतात घुसले. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, केम या गावाजवळील शेतात सिमेंट भरलेल्या रेल्वेचे इंजिन रूळ सोडून थेट शेतात घुसले. सुदैवाने शेतात लोकवस्ती किंवा व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरल्याने काही रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. आता ही रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्नही सुरु आहेत.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीला हा अपघात झाला. हा अपघात नेमका कुणाच्या चुकीने झाला, याचाही आता तपास केला जात आहे. मात्र सध्या अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत. सुदैवाने ही मालगाडी असल्यानं यात कोणतेही प्रवासी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होता. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, या अपघातानंतर या मालगाडीच्या चालकासोबत मालगाडी वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन नेमके काय घडले, याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून मालगाडीचे इंजिन नेमके शेतात कसे घुसले, याचा तपास करण्यासाठी चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – लालबागच्या राजाच्या दानपेटीत 4 दिवसांत 1.50 कोटींचं दान

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -