सरनाईक राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात, शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई?

maharashtra ed conection which shiv sena leader has been on ed radar know details in marathi
सरनाईक राऊतांनंतर अनिल परब ईडीच्या कचाट्यात, शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांवर आतापर्यंत कारवाई?

राज्यात सध्या राज्य सरकारविरुद्ध केंद्र तपास (Enforcement Directorate) यंत्रणा असा संघर्ष सुरु झालाय. या तपास यंत्रणांकडून राज्य सरकारमधील प्रामुख्याने शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाईचे शस्त्र उगारले जात आहे. अशात आज शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल परब यांच्या शासकीय निवास्थान, वांद्र्यातील निवासासह सात ठिकाणी ईडीने छापेमारी केली, तसेच त्यांच्या निकटवर्तींयांच्या घरीही ईडीने धाड टाकली आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडूनही सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह (Thackeray Government) शिवसेनेच्या बड्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप होत आहेत. मात्र शिवसेना (Shivsena) नेत्यांकडून सातत्याने हे आरोप फेटाळले जात आहेत. दरम्यान या आरोपांवरून अलीकडे राऊत विरुद्ध सोमय्या (kirit somaiya) असा वादही पाहायला मिळाला, राऊतानंतर किरीट सोमय्यांच्या रडारवर अनिल परब होते. सोमय्यांनी वारंवार पुरावे सादर करतं अनिल परबांनी मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप केला. यानंतर आज अखेर अनिल परबांच्या मालमत्तेवर ईडीने धाड टाकली. दरम्यान मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारमधील मधील मंत्र्यांवर आणि महत्त्वाच्या नेत्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यामुळे ईडी आणि आयकराच्या कारवायांमध्ये शिवसेना पहिल्या स्थानी असल्याचे दिसतेय. तर शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी आहे. या सर्वांच्या संपत्तीवरही ईडीने टाच आणली आहे. त्यामुळे ईडीच्या रडारवर असलेले हे शिवसेनेचे नेते कोण आहेत, याचा सखोल आणि विस्तृत आढावा जाणून घेऊ…

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?, सचिन वाझे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होणार

अनिल परब

शिवसेनेचे बडे नेते, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. ईडीने त्यांच्या राहत्या घरी आणि शासकीय निवासस्थान अजिंक्यतारासह एकूण ७ जागांवर छापेमारी केली आहे. अनिल परब यांच्यावर पोलिसांच्या बदल्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सचिन वाझेने केले आहेत. अनिल देशमुख आणि अनिल परब यांना पोलीस बदल्यांमधील पैसे दिले असल्याचा जबाब सचिन वाझेने दिला आहे. यामुळे अनिल परब अडचणीत आले आहेत.

संजय राऊत

शिवसेनेचे खासदार anjay Raut (संजय राऊत ) यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावरही ईडीने कारवाई केली. त्यांच्या अलिबागमधील 8 जागा आणि दादरमधील एक प्लॅट ईडीकडून जप्त करण्यात आला. पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं बोललं जात आहे. याच प्रकरणी संजय राऊतांच्या संपत्तीही ईडीकडून टाच मारण्यात आली, मनी लाँड्रिंगमधील पैशातून संपत्ती खरेदी केल्याची माहिती ईडीनं दिलीय.

प्रताप सरनाईक

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. ईडीने तिसऱ्यांदा सरनाईक यांच्याविरोधात कारवाई केली आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

भावना गवळी

दरम्यान शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्यावरही शिवसैनिक हरीश सारडा यांनी केलेल्या तक्रारीनंतर ईडीने कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात 100 एकर जमीन असलेल्या बालाजी पार्टीकल बोर्डाच्या सहकारी कारखान्याबाबतच्या एकूण खरेदी-विक्री व्यवहारात घोटाळा केल्याचे आरोप आहेत. यात भावना गवळींवर खोट्या सह्या करून ट्रस्टची कंपनी बनवून नॉन प्रॉफिट कंपनी असल्याचं दाखवून पैशांची अफरातफर केल्याचे म्हटले जाते.

अर्जुन खोतकर

शिवसेना मंत्री आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांचीही ED ने चौकशी केली. 10 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची जमीन अर्जुन खोतकर यांनी हडप केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला,

आनंदराव अडसुळ

शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांच्यावरही ईडीने कारवाई केली, सिटी बॅंकेच्या माध्यमातून मराठी माणसांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आल. सिटी बॅंकेत कामगार, पेंशनधारक अशा 99 टक्के मराठी माणसांची खाती होती. मात्र या बॅंकेतील पैसे बिल्डरांना अवैधरित्या वाटणे आणि कमिशन घेतल्याचा आरोप त्याच्यावर झाले.

दरम्यान मुख्यमत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचीही संपत्ती अलीकडे ईडीने जप्त केली. पाटणकर यांच्यावर पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने कारवाई केली. यात पाटणकरांचे ठाण्यातील 11 फ्लॅटसह 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे अनेक नेते ईडीच्या (ED Action) रडारवर आहेत. शिवसेनेच्या बड्या नेत्यांसह मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, राहुल कनाल या शिवसेना नेत्यांच्या घरावर आयकर खात्याने छापे टाकले होते. मात्र शिवसेना या कारवाईला घाबरत नसल्याचं विधान संजय राऊत म्हणाले. पण ईडीच्या या कारवाईमुळे राजकारण आणखी तापणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


प्रताप सरनाईक यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप कोणते? मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचे कारण काय?