घरताज्या घडामोडीकृष्णकुंजचे लकी नंबर ६ चे कनेक्शन

कृष्णकुंजचे लकी नंबर ६ चे कनेक्शन

Subscribe

राज ठाकरे यांचे ९ नंबरी प्रेम हे मनसैनिकांपासून ते महाराष्ट्रातील राजकारणात सगळ्यांनाच परिचित असे आहे. त्यामुळेच राज ठाकरेंच्या प्रत्येक शुभ गोष्टींसाठी त्यांचा ९ लकी नंबर हा कनेक्टेड असतोच. मग महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची स्थापना असो वा राजकीय कार्यक्रमांची आणखी असो वा घरातील शुभकार्य. ९ नंबरचा लकी आकडा हा राज ठाकरेंच्या आतापर्यंतच्या राजकीय करिअरशी संबंधित आहेच. मुलगा अमित ठाकरेंना लकी असणाऱ्या ६ नंबरचेही कनेक्शन नुकतेच समोर आले आहे. नाशिक महापालिका निवडणूकांच्या निमित्ताने नाशकात सक्रीय झालेल्या अमित ठाकरेंबाबतचे प्रेमही नुकत्याच एका घटनेतून दिसून आले आहे. राज ठाकरेंना अमित ठाकरेंना एक गाडी गिफ्ट करायची होती. अमित ठाकरेंसाठी लकी असणारी ६ क्रमांकाची गाडी राज ठाकरेंनी गिफ्ट केली आहे. या गाडीच्या निमित्ताने अमित ठाकरेंचा ६ नंबर लकी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

काय ६ नंबरच्या लॅंड रोव्हर डिफेंडरचा किस्सा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक दौऱ्यावर आहेत. पण यंदाच्या नाशिक दौऱ्यात चर्चा आहे ती मात्र राज ठाकरेंनी ड्राईव्ह केलेल्या लॅंड रोव्हर डिफेंडरची. राज ठाकरे हे आलिशान गाड्यांचे प्रचंड मोठे चाहते आहेत. आपला मुलगा अमितसाठी त्यांना अशीच आलिशान गाडी गिफ्ट करायची होती. त्यामुळे राज ठाकरेंनी लॅंड रोव्हर डिफेंडरची निवड केली. पण हे मॉडेल महाराष्ट्रात मर्यादित उपलब्ध असल्यानेच त्यांनी गाडीच्या बंदोबस्ताची जबाबदारी ही नाशिकमधील एका ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील व्यक्तीकडे दिली. राज ठाकरे यांच्या पसंतीची लॅंड रोव्हर डिफेंडर अखेर कर्नाटकातून नाशिकला आल्याचे कळते. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक युनिटच्या नावावर या गाडीची नोंदही आरटीओमध्ये झाली आहे. राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर पोहचल्यानंतर या गाडीची स्टेअरींग सांभाळत ते लॅंड रोव्हर डिफेंडर घेऊन नियोजित कार्यक्रमासाठी गेले. पण अमित ठाकरेंसाठी ६ नंबरची कार त्यांनी नियोजन केल्यानुसार आता उपलब्ध हे मात्र निश्चित. यापुढच्या काळात अमित ठाकरे ही कार वापरणार असल्याचे कळते.

- Advertisement -

लकी ६ नंबरचा असेही कनेक्शन

राज ठाकरेंसाठी ९ हा शुभ आकडा असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या गाडीचा क्रमांकही ९ आहे. परंतु, राज ठाकरेंनी स्टिअरिंग हाती घेतलेल्या गाडीचा क्रमांक ६ का, असा प्रश्न उपस्थित झाला. राजपुत्र अमित ठाकरे यांच्यावर नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरे यांचा वाढदिवस २४ मे रोजी असतो. त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेची बेरीज ६ येते. तर नाशिकचा आरटीओ पासिंग क्रमांक एम.एच. १५ असा आहे. या कोडची बेरीजही ६ येते. अमित यांना ६ हा लकी आकडा मानला जात असल्याने आगामी महापालिकेत मनसेला लॉटरी लागणार का, अशी चर्चाही यानिमित्ताने रंगली आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंचे ९ नंबरचे कनेक्शन

शिवसेनेला रामराम १८ डिसेंबर २००५ (१+८) = ९
शिवतीर्थावरील पहिली सभा १८ मार्च (१+८) = ९
पहिल्या विधानसभा निवडणूक पहिली उमेदवार यादी २७ (२+७) = ९
दुसऱ्या उमेदवारीत यादीत ४५ उमेदवारांची घोषणा (४+५) = ९
ताफ्यातील गाड्यांची नंबर प्लेट ९
उद्धव ठाकरेंवर एन्जिओग्राफीनंतर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत याच कारमधून दिसले होते


हेही वाचा – लँड रोव्हर… स्टिअरिंग… आणि राज ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -