घरमहाराष्ट्रखाते वाटपाबाबत चर्चा; पण उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात...

खाते वाटपाबाबत चर्चा; पण उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणतात…

Subscribe

शिंदे – फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 38 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पार पडला. शिंदे फडणवीस सरकारमधील 18 मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. यात शिंदे गटाचे 9 आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. यापुढे होणा-या विस्तारात राज्यमंत्र्यांची घोषणा होणार आहे. यानंतर आता कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळणार यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. तर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संभाव्य मंत्र्याच्या खाते वाटपाची एक यादी व्हायरल होत आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धनुष्यबाण शिवसेनेचाच, पक्षाचं चिन्ह काढून घेता येत नाही, पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका

माध्यमांनी खाते वाटप करून टाकले आमच्यासाठी काही शिल्लकचं ठेवलं नाही, माध्यमांनीच खाते वाटप करून टाकलं पण तुम्ही केलेले खाते वाटप सपशेल चुकीचे ठरेल, अस स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या संभाव्य खाते वाटपातील कोणत्या मंत्र्याला कोणते मंत्री पद मिळते हे पाहावले लागेल.

- Advertisement -

दरम्यान मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती ही भाजपला मिळणार असून उर्वरित खाती शिवसेनेच्या शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा रंगतेय. यात गृह आणि अर्थ खातं हे भाजपकडे राहिल. तर उत्पादन शुल्क, सामाजिक न्याय, रोजगार हमी ही खाती शिंदे गटाला दिली जाण्याची शक्यता आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना – भाजपचे पुन्हा 9 चे गणित

मंत्रिमंडळाची व्हायरल होणारी संभाव्य खाते वाटप

भाजपचे मंत्री 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास मंत्री

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – वित्त, गृह मंत्री

आमदार राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, सहकार मंत्री

आमदार सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा व वन मंत्री

आमदार चंद्रकांत दादा पाटील – सार्वजनिक बांधकाम मंत्री

आमदार विजयकुमार गावित – आदिवासी कल्याण मंत्री

आमदार गिरीश महाजन – जलसंपदा मंत्री

आमदार सुरेश खाडे भाजप – सामाजिक न्याय मंत्री

आमदार मंगल प्रभात लोढा – विधी व न्याय मंत्री

आमदार अतुल सावे – सामाजिक आरोग्य मंत्री

आमदार रवींद्र चव्हाण – गृह निर्माण मंत्री

शिंदे गटातील मंत्री

आमदार गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा मंत्री

आमदार दादासाहेब भुसे – कृषी मंत्री

आमदार संजय राठोड – ग्राम विकास मंत्री

आमदार संदिपान भुमरे – रोजगार हमी मंत्री

आमदार उदय सामंत – उद्योग मंत्री

आमदार तानाजी सावंत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

आमदार अब्दुल सत्तार – अल्पसंख्य विभाग मंत्री

आमदार दीपक केसरकर पर्यटन व पर्यावरण मंत्री

आमदार शंभूराजे देसाई – राज्य उत्पादन शुल्क मंत्री


…तर कायदा मोडण्याचे अधिकार आम्हाला, केंद्रीय मंत्री गडकरींचे वक्तव्य

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -