उद्धव ठाकरेंबद्दल पुन्हा बोलणार नाही, सोमय्यांनी दिला शब्द

bjp leader kirit somaiya question to thackeray government over the Buldhana Co-operative Credit Society

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी (Kirit Somaiya) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ‘माफिया’ असा उल्लेख केल्याने शिंदे गटातील आमदार संतप्त झाले आहेत. त्यांनी आपल्या भावना भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे व्यक्त केल्या. त्यानंतर, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पुन्हा बोलणार नाही, असा शब्द किरीट सोमय्या यांनी दिल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले.

किरीट सोमय्या यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्याबदल अभिनंदन केले, असे ट्विट त्यांनी या भेटीनंतर केले. त्यावरून दीपक केसरकर आणि आमदार संजय गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत कोणी काहीही बोलले तर ते खपवून घेतले जणार नाही, असा इशारा दीपक केसरकर व आमदार संजय गायकवाड यांनी दिला.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी हाच मुद्दा मांडला. आम्ही कुटुंब सोडून आलो आहे, परंतु आमच्या कुटुंबप्रमुखांबद्दल कोणी काही बोलू नये. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाचा मन कायम राहिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी वैयक्तिक टीका केली आहे. जेव्हा ठाकरेंवर आरोप झाले, तेव्हा आम्ही सगळे आमदार पेटून उठलो. आमच्यातल्या प्रत्येकाला असे वाटते की आमच्या नेत्याची बदनामी करू नये, असे केसरकर म्हणाले.

हेही वाचा – १०० आमदार, २५ खासदार निवडून आणण्याची ताकद धनुष्यबाणामध्ये, राऊतांनी नाशिकमध्ये डागली तोफ

यासंदर्भात फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीसुद्धा याबाबत बोलणे झाले होते, असे मान्य केले. आपली युती झाली असल्याने आपल्या पक्षप्रमुखांचा आम्हाला अभिमान आहे. भाजपामध्ये कोणी काही बोलणार नाही, असे फडणवीस म्हणाले. आधी जेव्हा बैठक झाली, तेव्हा सोमय्या उपस्थित नव्हते. त्यामुळे आपले जे ठरले ते त्यांना माहिती नव्हते. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंबद्दल पुन्हा बोलणार नाही. पण ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे, ती सुरूच राहील, असे सोमय्या यांनी सांगितल्याची माहिती केसरकरांनी दिली.

पक्षचिन्हावर दावा केलेला नाही
शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण, कायद्याच्या दृष्टीने बघितले आणि घटनेत जे काही नमूद केले आहे, त्यानुसार धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल ठामपणे सांगितले. त्याबाबत दीपक केसरकर म्हणाले, पक्ष चिन्हावर कोणीही दावा केलेला नाही. आमचा शिवसेना विधिमंडळ पक्ष आहे, एवढेच आमचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदेंचे दु:ख
बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेत ‘उठाव’ करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्यासोबत नसल्याचे दु:ख आहे. ते आपल्यासोबत असावेत, ही इच्छा लवकर पूर्ण व्हायला पाहिजे, अशी त्यांची बावना असल्याचे केसरकर म्हणाले.

हेही वाचा – श्रीलंकेतील स्थिती आणखी गंभीर, नागरिक आक्रमक होताच राष्ट्रपतींचा पळ